spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; Mahayuti की Mahavikas Aghadi नेमका कोणत्या ‘M’ ला मिळणार वाढत्या मतदानाचा फायदा ?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. राज्यात महायुती (M) आणि महाविकास आघाडी (M) यांच्यात मुख्य लढत आहे. आता यामध्ये कोणता M बाजी मारणार आहे? महिला मतदारांचा फायदा नेमका कोणाला होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून ७६ टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात ८४.७९ टक्के झालं आहे.

राज्यात १९९५ मध्ये जोरदार मतदान झाले होते. ७१.६९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात प्रथमच गैर काँग्रेस सरकार बनली होती. यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार? याची चर्चाही रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची जोरदार प्रचार मोहीम राबवली. भाजपने ‘बंटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणांनी निवडणुकीतील रणनीती बदलली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने भावनात्मक अपील केली. तसेच मतदानाचा दिवस शनिवार, रविवार असा सुट्टीला जोडून ठेवला नाही. त्यामुळे लोक बाहेरगावी न जाता मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले. तसेच निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 8.85 कोटी मतदार होते, जे आता 9.5 टक्क्यांनी वाढून 9.69 कोटी झाले आहेत.

तसेच दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे मतदान हे वाढले आहे. महायुती सरकारने आणलेल्या आणि राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणामस्वरूप यंदाच्या निवडणुकीत महिलांचा मतटक्का वाढण्यातही दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांचे प्रमाण वाढल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. ही योजना महिलांसाठी विशेष सवलती आणि सुविधांचे आश्वासन देते, ज्यामुळे महिला मतदारांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणत्या M ला होणार? महायुतीला की महाविकास आघाडी ला ? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? हे चित्र आता येत्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss