लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० हत्तीचा बळ मिळाल्याचे चित्र निर्माण झालं. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या मान्यवरांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. तसाच प्रकार भोसरी विधानसभा मतदार संघात घडलाय. अजित गव्हाणे यांनी अजित पवाराची साथ सोडली आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये उडी मारली. अपेक्षेप्रमाणे गव्हाणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भोसरीचा आखाडा कोण मारणार म्हणून जोरदार चर्चा सध्या विधानसभा मतदार संघात सुरू आहे. गेल्या दहा वर्षामध्ये महेश लांडगे यांच्याबाबत एंटी इनकमबंसी निर्माण झाल्याची चर्चा, त्यासोबतच महेश लांडगे यांच्यावर माजी नगरसेवक नाराज आहेत त्यामुळे गव्हाणे यावेळी बाजी मारतील अशी देखील चर्चा होते. परंतु त्याच वेळी महेश लांडगे यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या विकास कामामुळे समाविष्ट गावांना दिलेल्या न्यायामुळे महेश लांडगे हैट्रिक करतील आणि भोसरीचं मैदान पुन्हा मारतील अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
https://youtu.be/mmo258Z9YfQ?si=pXmpaiXuscZwEPQd
अजित गव्हाणे यांनी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलाय. आमदार लांडगे यांनी गेल्या १० वर्षा मध्ये काय केलयं ? असा प्रश्न गव्हाणे यांनी वारंवार उपस्थित केलाय. खरं म्हणजे २०१४ मध्ये महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांचे राजकीय गुरु माजी आमदार विलास लांडे यांचा अपक्ष उभा राहून पराभव केला होता. लांडे यांच्या राजकारणाला त्यांच्या विरोधात बंड म्हणजे महेश लांडगे यांचा राजकीय उदय होता, हे मान्य कराव लागेल. विलास लांडे नकोत म्हणून साधा एक नगरसेवक असलेल्या महेश लांडगे यांच्या मागे त्यावेळचा राष्ट्रवादीतील नगरसेवक म्हणून उभा राहिले आणि विलास लांडे यांच्यासारख्या त्या वेळचा बलाढ्य राजकीय नेत्यांचा महेश लांडगेंनी पराभव केला होता. एवढंच नाही तर गेल्या दहा वर्षात विलास लांडे यांनी दोन वेळा महेश लांडगेंच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यावेळी भोसरीच्या जनतेने महेश लांडगे यांच्या झोळीमध्ये मतांचं दान टाकत, विलास लांडे यांना पराभूत केलं. हे सांगायचं कारण म्हणजे अजित गव्हाणे यांचं शरद पवार गटाकडून तिकीट निश्चित करण्यामध्ये विलास लांडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. याबाबत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलं. अजित गव्हाणे यांना महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेलाये. आता रवी लांडगे यांनी अर्ज माघारी घेतला तरी सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे काम करतील का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय , आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे या शिवसैनिकांनी तशी भूमिका देखील उघडपणे घेतली, तसं झालं तर त्याचा फटका हा अजित गव्हाणे यांनाच बसणार आहे.
गेल्या १० वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित करून गव्हाणे आणि त्यांच्या यंत्रानें रस्त्यावरील खड्ड्यांपासून ते प्रलंबित प्रश्नांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. मात्र गव्हाणे यांचा सेल्फ गोल झाल्याची चर्चा भोसरी मतदार संघामध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे. त्याच कारण म्हणजे महेश लांडगे हे त्यांच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांनी केलेल्या कामाची आणि सोडवलेली प्रश्नांची यादीच वाचून दाखवतायेत. त्यामुळे गव्हाणे आणि त्यांची टीम हे केवळ आरोप करताना दिसतायेत. ते २५ वर्ष नगरसेवक होते त्या काळात त्यांनी काय केलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते काय काम करणार आहेत या विषयी मात्र गव्हाणे सांगत नाहीत असं चित्र सध्या निर्माण झाले. अजित गव्हाणे यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि अभ्यासू म्हणून सुरुवाल तयार झाली होती मात्र त्यांनी हातात घेतलेले जे हे मुद्दे ते पाहता केवळ ते राजकीय दिसतायेत.
महेश लांडगे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतायेत, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात ते अधिक घट्ट बसतानाचे चित्र दिसतंय. आणि अजित गव्हाणे यांनीही विकासाच्या मुद्यावरच मांडणी करावी आणि भोसरी मतदार संघाचा व्हिजन मांडावं अशी भोसरीकरांची अपेक्षा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे भाजपात आणि महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेल्या माजी नगरसेवकाची भोसरीसह पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायमत चर्चा राहिलीये. आताही माजी नगरसेवक सोबत असतील तर गव्हाणे यांचा विजय सोपा होईल असा दावा केला जातोय, मात्र जे नगरसेवक आजच्या घडीला गव्हांणेंसोबत आहेत ते २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्यासोबत नव्हते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे किंबहुना जे सोबत होते त्यातील अनेकांनी लांडगे विरोधातच काम केलं. त्यात गेल्या दोन अडीच वर्षा पासून महापालिका प्रशासक राजवट आहे त्यामुळे नगरसेवक आणि नागरिकांची असलेला जो त्यांचा कनेक्ट आहे तो कमी झालेला आहे. परंतु असे लोकांमध्ये जाऊन काम केलेले किती नगरसेवक हे गव्हांणेंसोबत आहेत हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. मतदानाला अवघे थोडे दिवस बाकी आहेत मात्र अजूनही गव्हाणे यांच्याकडून एकाही व्हिजनच्या बाबतीत एखाद्या मुद्दयावर चर्चा होत नाही त्यामुळे केवळ आरोप करून निवडणूक जिंकता येईल असं म्हणणं अति आत्मविश्वासाचं ठरू शकत. शेवटी मतदारराजा निर्णय घेत असतो ते कोणाला मत देणार आणि कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
हे ही वाचा:
Ajit Pawar यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “मी बारामतीतून लढणारच नव्हतो…”
बँकेत गैरव्यवहार झालाच नाही; पोलिसांची दुसर्यांदा कोर्टात धाव