विधानसभा निवडणूकाचे वारे वेगाने वाहत आहे आणि प्रचार सभेला सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष नेते आपआपल्या मतदारसंघात प्रचार सभा करत आहे. फक्त ७ दिवस बाकी आहे मतदानासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ कल्याण आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना-यूबीटी गटाकडून सुभाष भोईर यांना तिकीट देण्यात आले आहे. राजेश मोरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. तर मनसे कडून राजू पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. २०१९ मध्ये राजू पाटील हे आमदार झाले होते. राजू पाटील यांची मुलाखत टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली आहे.
या वेळेस टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी मनसे उमेदवार राजू पाटील यांना ” तर एका बाजूला तुमच्याशी इतक्या प्रेमाने वागणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्याबाजूला तुम्ही असो किंवा रवींद्र चव्हाण असो या दोघांबरोबर शाब्दिक, वैचारिक, विकास कामांचा पंगा घेणारे श्रीकांत शिंदे मी तुमच्या बरोबर समजू शकतो तुम्ही काही तरी त्यांना भूमी पुत्राच्या स्टाईल मध्ये बोलत असाल पण रवींद्र चव्हाणांशी त्यांचा पंगा होतो असं का होतोय म्हणजे तुम्ही नेमकं तुम्ही त्यांची कळ का काढता? ”
मी नाही कळ काढत. तो माणूसच तसा आहे तो. तुम्ही फक्त लोकसभेला बघा ना पूर्ण सारे विधानसभा बघा तुम्हाला तसाच उत्तर देईल. दोघे जण तुम्हाला स्पष्ट उत्तर देणार नाही, अंबरनाथ, उल्हासनगर . बाकी गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रत्येक गोष्टी स्वतः केलं श्रेय घायचे. जिल्हा परिषदेपासूनच्या महाराष्ट्र सरकार पर्यंतच्या आलेल्या कामाच्या श्रेय घेण्यासाठी पाट्या लागलेल्या आहेत. माझ्या पुरत तुम्ही बोलाल तर मला हा काय विषय नाही काम होतात ना बरीचशी काम मी सुचवली ते ओव्हरलॅप करून गेलेले. अर्थात त्यांचे वडील त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांना निधी आला तो. सुचवले आम्ही होतो, तुमच्या म्हणणे नुसार असं आहे कि शिंदेसाहेब आमच्याशी चांगले असतात मग हे का असं तर शिंदे साहेब शिंदे साहेब आहे.
“याची देही याचे डोळा त्याचा अनुभव आला म्हणजे एका बाजूला विधी मंडळामध्ये १४ गावांचा प्रश्न निकाली लागल्यानंतर तर ते बाहेर आल्या नंतर तुम्ही बोलत असलेले जिन्याखाली एका आडोशाला असलेले तुम्ही त्यांना दिसता. ते तुम्हाला बोलवून शाबासकी देतात किंवा तुमचा प्रश्न निकाली काढला असं सांगता आणि मग दुसरी कडे ज्यावेळेला आम्ही असं बघतो कि तुमचं सतत काही तरी धुसपूस चाललेली आहे. कुठे तरी धुमस चाललेली आहे तर मग हे. तुम्ही थोडं त्यांच्या कलाने घेण्याचा तुम्हाला योग्य वाटत नाही का, कि म्हणजे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. तुमचे सहकारी आहेत मित्र आहेत.” असं विचारण्यात आल्यावर ते बोलले
श्रीकांत शिंदे हे खासदार ते त्यांच्या घरी आहेत. इथे मी पण काही तरी आहे ना. मी कला नाही घेणारा आहे, किंवा वागणारा माणूस नाही आहे. माझा तो स्वभाव नाही आहे. स्वाभिमान गहाण ठेवायचं तर बिलकुल माझ्या मनात कधी येणार नाही. प्रेमाने माझी मान पण कापून घेऊ शकतात. शिंदे साहेब जे आहेत ना मुख्यमंत्री झाल्यावर मला काही लोक बोलले तुझा आणि खासदारांशी वाद होत असतो आता कस होईल. तर एवढ्या जवळचे मुख्यमंत्री माझी कोणी होतील का. त्याचा प्रत्यय आला मला फडके रोडला जी आमची दिवाळी पहाट असते त्यावेळेस. सीएम साहेब आलेले. तिथेच माझं ऑफिस आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आलात की ऑफिसला या. तर ते चुकून स्टेजच्या बाजूला उतरले तर मी तिथे गेल्यावर बोलले,अरे राजू ते तुझ्या ऑफिसला जायचं होत. हा बोललो साहेब येतंय का, मी त्यांना हाताला धरून घेऊन गेलो, असा कोण मुख्यमंत्री असले ज्याच्या मी हाताला धरू शकतो. माझे संबंध आहेत शिंदे साहेबांशी.