महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्या 20 नोव्हेंबरला मतदान होणारे तर २३ नोव्हेंबराला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. काल म्हणजेच 18 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. त्यातच बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सक्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. अशातच युगेंद्र पवारांच्या शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केली. त्यावेळी त्यांना तिथे काहीही आढळून आले नसल्याची माहिती निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाचे अधिकारी वैभव नावडकर यांच्या माहितीनुसार, शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार शरयू मोटर्स या ठिकाणी तपासणी करण्यात आली. पण आम्हाला त्याठिकाणी आम्हाला काहीही आढळून आले नसल्याचे वैभव नावडकर म्हणाले. या सर्व प्रकाराबाबत युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, रात्री शरयू मोटर्स हे शोरूम बंद होते. मात्र, अधिकारी आल्यावर तक्रार आल्याचे सांगितले. आमच्या शोरूमच्या स्टाफने निवडणूक अधिकाऱ्यांना शोरूममध्ये नेल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. अधिकाऱ्यांनी शोरुमची सगळी तपासणी केली पण त्यांना तिथे काहीही संशयास्पद आढळले नाही. ते सत्तेत आहेत त्यामुळे हे सर्व होणारच होते असेही श्रीनिवास पवार असे म्हणाले.
या सर्व प्रकाराबद्दल युगेंद्र पवार म्हणाले की, “आमच्या शोरुमची तपासणी करण्यासाठी कोणी अधिकाऱ्यांना पाठवले हे आम्हाला माहीत नाही. पण आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केले. रात्री साडेदहाच्या सुमारास १० ते १२ अधिकारी आले होते. त्यांनी सर्च ऑपरेशन केले. जोपर्यंत काही फॅक्ट्स समोर येत नाही तोपर्यंत त्याबाबतीत काहीही बोलणे चुकीचे आहे. सगळ्या चौकशीला आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार आहोत”, असे युगेंद्र पवार म्हणाले.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलिया मीडिया पडलाय कोहलीच्या प्रेमात, धावांचा दुष्काळ संपणार आहे का?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.