Optus Stadium, Perth : Border Gavaskar Trophy 2024-25 : भारत-ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी काही खेळाडूंसाठी महत्त्वाची सीरीज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, त्यातील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे.
एरवी जेव्हा आपण भारताच्या वर्तमानपत्राचे स्पोर्ट्स पेज उघडतो तेव्हा आपल्याला भारतीय क्रिकेट मधील हीरोंचे फोटो मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. पण ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत सध्या तशीच परिस्थिती दिसून येत आहे. इथल्या वर्तमानपत्रात जणू ऑस्ट्रेलियन क्रिकेट चे हीरो गायबच झाले आहेत आणि त्याची जागा टीम इंडीयाच्या प्लेयर्सने घेतली आहे. त्यात ही विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या तमाम वर्तमानपत्राची पहली पसंती ठरला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्याआधी संपूर्ण ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीची चर्चा आहे. रोज तिथल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये कोहलीच्या मोठ्या फोटोंसह ‘किंग’, ‘गॉड’, ‘GOAT’ अशी विशेषण त्याच्यासाठी वापरली जात आहेत. त्याशिवाय विराटच्या फॉर्मबद्दलही चर्चा होतेय. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया मधील वर्तमानपत्र उघडलीत तर ‘किंग कोहली’ चे मोठ्ठे फॉटो तुम्हाला सर्व वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतील.
भारता सारखे ऑस्ट्रेलियामध्ये पण खेळाडू विराट कोहलचा मोठा चाहता वर्ग आहे. ऑस्ट्रेलियातील प्रमुख मोठे शहर मेलबर्न, सिडनी, पर्थ, एडिलेड आणि ब्रिस्बेन या शहरात जेवढी ऑस्ट्रेलियन स्थानिक लोकांची वस्ती आहे त्याच्या समकक्ष भारतीय आणि एशियन समुदायात लोकं पण इथे राहतात. एके काळी ऑस्ट्रेलियात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या खेळाने इथली मैदानं गाजवली होती. आता सचिन तेंडुलकरनंतर तो मान विराट कोहलीला मिळताना दिसतोय. आणि का मिळू नये…, रन मशीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोहलीने प्रत्येक ऑस्ट्रेलियन मैदानात नेत्रदीपक फलंदाजीचा नमूना अगोदरच सादर केला आहे. आणि त्यामुळे फक्त भारतीयचं नव्हे तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते पण तेवढ्याच आतुरतेने कोहली सोबत एक छायाचित्र टिपण्यासाठी तासंतास वाट बघायला दिसतात. तर कोहलीने आत्ता पर्यंत कसोटीत नऊ हजार पेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
- पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ, सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी
- दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट), सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी
- तिसरा सामना, १४ ते १४ डिसेंबर, गाबा, पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी
- चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न, पहाटे ५ वाजता.
- पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी, पहाटे ५ वाजता.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा.
राखीव- खलील अहमद, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
हे ही वाचा:
22 Nov पासून Time Maharashtra च्या प्रेक्षकांसाठी कांगारूंच्या देशात Cricket, X’mas आणि खूप काही…