spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Border Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने भारतात लाईव्ह कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

India vs Australia 1st Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीला सुरुवात होण्यास काही तास उरले आहेत. हा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ तयारी करत आहेत. गेल्या दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणाऱ्या टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संदर्भातले सर्व अपडेट तुम्ही टाईम महाराष्ट्र वर बघू शकता. तर या मालिकेतील सर्व सामने कुठे पाहता येतील जाणून घेऊया.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा किमान ४-० असा पराभव करावा लागेल. यावेळी भारताला घरच्या मैदानावर कडवे आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलिया पूर्णपणे सज्ज असेल. रोहित शर्मा त्याचा दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे पर्थ कसोटीला मुकणार आहे. तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. रोहित शर्माच्या जागी सलामीला कोण उतरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी –
२२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी –
६-१० डिसेंबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (सकाळी ९:३० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी –
१४ – १८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी –
२६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (सकाळी ५.०० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी –
३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (सकाळी ५.०० वाजता)

प्राईम मिनिस्टर इलेव्हन वि भारत अ – २ दिवसीय सराव सामना –
३० नोव्हेंबर-०१ डिसेंबर, मनुका ओव्हल, कॅनबेरा (सकाळी ९.१० वाजता)

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss