IND vs AUS 1st Test Perth : ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत मालिकेत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांसमोर अवघ्या १५० धावांवर ढेर झाले. इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १५० धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिचेल मार्शलाही दोन बळी मिळाले. भारताकडून नवोदित नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक ४१ धावा केला.
टीम इंडियाचा संघ पहिल्या सामन्यांमध्ये ६ बदलांसह मैदानात उतरला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल हे देखील या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करत आहेत. भारताने न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत शेवटची कसोटी खेळली तेव्हा रोहित शर्मा, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सर्फराज खान आणि आकाश दीप प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत होते, जे पर्थमध्ये खेळत नाहीत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ ची सुरुवात पर्थ कसोटीने झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले, पण त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला आहे. जैस्वालला खातेही उघडता आले नाही. यानंतर शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ ५ धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली. ध्रुव जुरेल ११ धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरलाही चार धावा करता आल्या. पंत आणि नितीश यांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. कमिन्सने ही भागीदारी तोडली. पंत बाद होताच भारताचा डाव १५० धावांवर आटोपला. हर्षित राणा सात धावा करून बाद झाला तर बुमराह आठ धावा करून बाद झाला.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान