India vs Australia 1st Test Day : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला आहे. पर्थमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात गोलंदाजांनी १७ विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाचे टॉस जिकूंन पहिल्या डावात १५० धावा केल्या त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पलटवार करत कांगारुंना दणका दिला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ७ झटके दिले. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २७ ओव्हरमध्ये ७ विकेटस ६७ धावा केलया आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे अजुन ८३ धावांची आघाडी आहे. आता दुसर्या दिवशी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला झटपट 3 झटके टीम इंडियाला आघाडी मिळवून देणार का याकडे सर्वाच लक्ष लागले आहे. टीम इंडियाच्या १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला कॅप्टन जसप्रीत बुमराह याने सुरुंग लावला. बुमराहने नॅथन मॅकस्वीनी याला १० धावांवर बाद केलं. त्यानंतर बुमराहने कांगारुंना सलग २ झटके दिले. उस्मान ख्वाजा ८ याने ८ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथला भोपलाही फोडता आला नाही. स्मिथ गोल्डन डक झाला. त्यानंतर डेब्यूटंट हर्षित राणा याने ट्रेव्हिस हेडचा ऑफ स्टंप उडवत क्लिन बोल्ड केले आहे.
मोहम्मद सिराज याने मिचेल मार्श याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखला. केएलने मिचेलचा कॅच घेतला. मिचेलने ६ धावा केल्या. सिराज मार्नस लबुनेशला २ धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. तर त्यानंतर कॅप्टनने कॅप्टनला आऊट केलं. बुमराहने पॅट कमिन्सला ३ धावांवर विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. तर मिचेल स्टार्क ६ आणि एलेक्स कॅरी १९ धावांवर नाबाद परतले. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने २ विकेट्स मिळवल्या तर हर्षित राणा याने १ विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान