सुरक्षा दलात नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आता निर्माण झाली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) द्वारे कॉन्स्टेबल/ट्रेड्समन भर्ती २०२५ साठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.
सरकारी नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता
सुरक्षा दलात नोकरी अंतर्गत एकूण ११६१ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १० वी किंवा समक्षक पात्रता असे गरजेकजे आहे, याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
रिक्त पदे कोणती व किती जागा?
सुरक्षा दल भरती प्रक्रियेतून एकूण ११६१ पदं भरली जातील. यामध्ये कॉन्स्टेबल /कुक ४९३ पदे, कॉन्स्टेबल / कॉबलर ९ पदे, कॉन्स्टेबल / टेलर २३ पदे, कॉन्स्टेबल / बार्बर १९९ पदे, कॉन्स्टेबल / वॉशरमन २६२ पदे, कॉन्स्टेबल / स्वीपर १५२ पदे, कॉन्स्टेबल / पेंटर २ पदे, कॉन्स्टेबल / कारपेंटर ९ पदे, कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन ४ पदे, कॉन्स्टेबल / माळी ४ पदे, कॉन्स्टेबल / वेल्डर १ पदं, कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक १ पदं, कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट २ पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.
भरतीसाठी वयो मर्यादा अट
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २३ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ०५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ०३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना १०० रुपये शुल्क आकारण्यातच आले आहे. तर एस सी / एस टी / ExSM या उमेदवारांना परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं नाही.या पदासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५ म्हणजे आजपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५ आहे.सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा असेल तर अशा तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us