बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करायचंय तर ही माहिती नक्की वाचा. बँक ऑफ बडोदाने एक आनंदाची बातमी दिली असून ४००० रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर नक्की जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
बँक ऑफ बडोदामध्ये भरतीच्या संदर्भात अधिकृत सूचना जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांना या अधिकृत सूचनेचा आढावा घेता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना काही निकष अनिवार्य असणार आहेत. हे निकष शैक्षणिक असून वयोमर्यादेचेदेखील पालन करावे लागणार आहे. अधिकृत सूचनेनुसार पात्रता निकषांनुसार उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याबरोबर कमीत कमी वयोमर्यादा २० वर्षे तर जास्तीत जास्त २८ वर्षे वय असणारे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज भरण्यासाठी आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीत वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती या वर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर OBC प्रवर्गासाठी अधिक ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
१९ फेब्रुवारी २०२५ पासून भरतीचे अर्ज स्वीकारण्यास सुरु करण्यात आले असून उमेदवारांना ११ मार्च २०२५ तारखेपर्यं अर्ज भरता येणार आहे. परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातून येणाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क ८०० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गांकडून सारखीच रक्कम आकारण्यात येणार आहे. SC तसेच ST व महिला उमदेवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क आकारला जाणार आहे. तर PWBD प्रवर्गासाठी अर्ज शुल्क म्ह्णून ४०० रुपये भरायचे आहे.
एकूण चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी, लँग्वेज प्रोफेशिअन्सी टेस्ट आणि मेडिकल परीक्षेला हजेरी लावून त्यांना पास करावे लागणार आहे. तरच उमेदवारांना नियुक्तीस पात्र होता येणार आहे.