spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

बँकेत नोकरीची मोठी संधी! १२०० हून अधिक पदांवर भरती, कसा कराल अर्ज जाणून घ्या

तरुणांना बँकेत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यास येत आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील एकूण १२६७ पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना १७ जानेवारीपर्यत अर्ज करण्याची मुदत आहे.

कोणत्या विभागात किती जागा ?

ग्रामीण आणि कृषी बँकिंग विभाग: एकूण २०० जागा
किरकोळ दायित्व विभाग: एकूण २०० जागा
MSME बँकिंग विभाग: एकूण ३४१ जागा
माहिती सुरक्षा विभाग: एकूण ९ जागा
सुविधा व्यवस्थापन विभाग: एकूण २२ जागा
कॉर्पोरेट आणि संस्थात्मक पत विभाग: एकूण ३० जागा
वित्त विभाग : एकूण १३ जागा
माहिती तंत्रज्ञान विभाग: एकूण १७७ जागा
एंटरप्राइझ डेटा मॅनेजमेंट ऑफिस विभाग: एकूण २५ जागा

बँक ऑफ बडोदा भरती प्रक्रियेसाठी पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वर माहिती पाहू शकतात. या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १७ जानेवारी २०२५ देण्यात आली आहेय

उमेदवारांची निवड कशी होणार?

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणत्याही योग्य चाचणीचा समावेश असू शकतो. त्यानंतर, ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन परीक्षेत एकूण १५० प्रश्न असतील आणि त्याचे एकूण गुण २२५ असतील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी दोन्ही असेल, फक्त इंग्रजी भाषेची परीक्षा इंग्रजीमध्ये असेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मोठी संधी

दरवर्षी बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची त्यांना मोठी संधी आहे. दरम्यान, जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्.ांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १७ जानेवारी आहे. अवधी जरी असला तरी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘वन नेशन वन इलेक्शन’वर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘यापूर्वी देशात…’

पवारांच्या अनुपस्थितीत फडणवीस ठाकरे भेट राजकीय वर्तुळात खळबळ !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss