Canara Bank Jobs :सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. Credit Officer (कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल) च्या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख ३० जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
या अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवाराने किमान ६० टक्के गुणांसह पदवी पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच SC/ST/OBC/PWBD श्रेणीतील उमेदवारांना ५ टक्के सूट देण्यात येईल. या श्रेणीतील उमेदवारांना ५५ टक्के ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी ७५० रुपये आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क १५० रुपये ठेवण्यात आले आहे.ही फी फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल.
ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायची आहे किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशांसाठी ही मोठी संधी आहे. यासाठी फक्त पदवीपर्यंत (Graduation) शिक्षण असणे गरजेचे आहे. ज्यांचे शिक्षण ६० टक्के गुणांसह पदवीपर्यंत झालं आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळं पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० फेब्रुवारी देण्यात आली आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कॅनरा बँकेने काढलेल्या क्रेडिट ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ibpsonline.ibps.in/cbicojan25/ या वेबसाईटवर जावं लागेल. या बेवसाईटवर तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळेल. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा नंतर उर्वरित तपशील भरा स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा विहित पैसे भरा. ऑनलाइन फी आणि फॉर्म सबमिट करा.
हे ही वाचा :
बॉलीवूड अभिनेत्री Priyanka Chopra भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल