Infosys Jobs : देशातील नावांकित आयटी कंपनी इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत ६८०६ कोटी रुपयांचा नफा मिळवला असून नोकरभरतीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. तर इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत महसूल ४१७६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या आर्थिक वर्षात २०२३-२४ च्या तुलनेत इन्फोसिसच्या नफ्यात कमालीची वाढ झाली असून ११.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दमदार कामगिरीनंतर इन्फोसिसकडून येत्या आर्थिक वर्षात २० हजार जणांना नोकऱ्या देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ५५९१ जणांना नव्यानं नोकरी दिली आहे. सध्या इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाखाहून जास्त आहे. तर या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे समजले आहे.
इन्फोसिसनं येत्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२५-२६ मध्ये २० हजाराहून जास्त फ्रेशर्सना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी म्हटलं की, या चालू वर्षात फ्रेशर्सच्या भरतीसाठी मनुष्यबळाचा आढावा घेत असून या वर्षात १५ हजारांपेक्षा जास्त फ्रेशर्सना नोकरी दिली जाईल, असं ते म्हणाले. इन्फोसिसन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ११,९०० जणांना नोकरी दिली होती. तर यापूर्वी म्हणजेच २०२२-२३ मध्ये ५०,००० फ्रेशर्सना कंपनीत भरती करून घेण्यात आलं होतं. जयेश संघराजका यांनी १ जानेवारीपासून पगारवाढी संदर्भात बोलताना ज्युनिअर लेव्हलच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. वरिष्ठ लेव्हलच्या अधिकाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून लागू होणार, असं जयेश संघराजका म्हणाले. ६-८ टक्के वेतनवाढीची शक्यता नोंदवली जात आहे. कंपनीचा युरोप आणि अमेरिकेतली व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे नफा मिळवून देत आहे.
दुसरीकडे टाटा कन्सलटन्सीमध्ये तिसऱ्या तिमाहीत 5370 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर आज घसरला आहे. आज जवळपास 105 रुपयांची घसरण इन्फोसिसच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती