Class 10th Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या पासून सुरु होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील ७०१ परीक्षा केंद्रांवरील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख अंशी हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. यापैकी राज्यातील ५१३० केंद्रांपैकी ७०१ केंद्राचा सगळे कर्मचारी बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा मोठा निर्णय घेण्यात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८० हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे.
कोणत्या परीक्षा केंद्रांवर कर्मचारी बदलण्यात आले?
पुणे – १३९
नाशिक -९३
नागपूर – ८६
मुंबई – १८
कोल्हापूर – ५४
लातूर – ५९
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चला होणार आहे. परीक्षेसाठी एकूण १६,११,६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ८,६४,१२० मुले, ७,४७,४७१ मुली १९ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण २३४९२ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याव्यर्थ्यांसाठी ५१३० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच, राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरु होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.