महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) पार पाडण्यात आली होती. पेपर I म्हणज ईयत्ता १ली ते ५ वी व पेपर II इ. ६ वी ते ८ वीच्या परीक्षेचा अंतिम निकाल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे अकाउंट वेबसाईट वर लॉग इन करून निकाल पाहता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात १० तारखेला ही परीक्षा झाली होती. साडे तीन महिन्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप असल्यास किंवा गुणपडताळणी करायची असल्यास १ ते ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीनमधून Online पद्धतीने नोंदविता येणार आहे. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’ घेण्यात आली होती. तीन वर्षानंतर झालेली ही परीक्षा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची होती. त्यामुळे डीएड, बीएडधारकांचे या परीक्षेकडे लक्ष होते. मागील परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेत परिषदेने परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल केले होते. सीसीटीव्ही कॅमेरा, नियंत्रण कक्षाच्या नियंत्रणात परीक्षा झाली होती. त्यासह उपस्थिती नोंदविण्यासाठी प्रथमच फेस रीडर बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात आला होता.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १० नोव्हेंबरला (रविवारी) राज्यभरात विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. नोंदणी केलेल्या ३ लाख ५३ हजार ९५२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २९ हजार ३४६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ‘फेस रीडर बायोमेट्रिक प्रणाली’द्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी तासभर आधी विद्यार्थ्यांना बोलावूनही काही केंद्रावर प्रशासनाची धांदल उडाली होती. परीक्षा कक्षात काहींची उपस्थिती फेस रीडर Biometric पद्धतीने उपस्थिती नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे कोणाला आपल्या गुणांबद्दल शंका असल्यास किंवा काही त्रुटी वाटल्यास ६ फेब्रुवारी पर्यंत गुणपडताळणी साठी अप्लाय करू शकतात.
हे ही वाचा :
Dandruff समस्येसाठी करा हा रामबाण उपाय