spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

(EIL) Recruitment 2024 : इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये एकूण ५८ पदांची मोठी भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज…

EIL Recruitment 2024 : भारतात सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या तरुणांना एक सुवर्ण संधी समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये संधी उपलब्ध झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवार इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने विविध उच्च पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती मोहीम केवळ इंजिनियर्ससाठीच नाहीतर तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीचही उत्तम संधी आहे. उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत इंजिनीअर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर अशी एकूण ५८ पदाची भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १९ नोव्हेंबरपासून EIL च्या अधिकृत वेबसाइटला ऑनलाईन पद्धतीने भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२४ आहे.

पदसंख्या एकूण – ५८ जागा

पदांचे नाव आणि तपशील –

अभियंता – एकूण ६ जागा
उपव्यवस्थापक – एकूण २४ जागा
व्यवस्थापक – एकूण २४ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक – एकूण ३ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक – एकूण १ जागा

शैक्षणिक पात्रता

अभियंता – संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी
उपव्यवस्थापक (रॉक अभियांत्रिकी) – BE/B.Tech/B.Sc.(अभियांत्रिकी)
व्यवस्थापक – BE/B.Tech/B.Sc. (अभियांत्रिकी)
वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक महाव्यवस्थापक – पदवी/पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वयाची अट – ३२ ते ३६ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ डिसेंबर २०२४

अर्ज कसा करावा

१ https://recruitment.eil.co.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२ मुख्यपृष्ठावरील “करिअर” विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
३ तुमच्या पात्रतेची पुष्टी करा आणि ऑनलाइन अर्ज भरा.
४ आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.
५ अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
६ भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Latest Posts

Don't Miss