spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

तरुणांनो तयारीला लागा! होमगार्ड पदासाठी 2 हजार 771 भरणार, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?

बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या (Home Guard) २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत ही १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज ०. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा, असे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी केले आहे.

 

देशात होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जाते. होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात येते.

उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा

काही वर्षापूर्वी मुंबईतील होमगार्डच्या रिक्त जागा भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी १५०० होमगार्डची भरती करण्यात आली होती. पोलीस दलातील अपुऱ्या संख्येवर जास्तीचा ताण येत असल्यामुळं बंदोबस्ताचा भार होमगार्डवर सोपवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा होमगार्डच्या २७७१ जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी प्रक्रिया करण्यात येत आहे. १० जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

होमगार्डसाठी पात्रता काय?

होमगार्डसाठी अर्ज करणार असाल तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते.

आवश्यक कागदपत्रे

होमगार्डसाठी अर्ज करताना लागणारी रहीवासी पुरावा, शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरता १० बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss