सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर यांनी शिक्षण आणि संशोधन शाखांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, कला आणि इतर क्षेत्रांशी संबंधित आहे. ३१ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची मुदत असणार आहे.
कुठे कराल अर्ज?
दरम्यान, दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहील. यावेळी, उमेदवार आयआयटी कानपूरच्या https://www.iitk.ac.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील पदवी, MCA, MSc, B.Tech, BE, हॉटेल व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, एमफिल किंवा इतर पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
यासोबतच पदानुसार वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून यामध्ये किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 57 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागणार?
गट A पदांसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
SC, ST आणि PH प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क असेल. त
गट B आणि C पदांसाठी, सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना 700 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
SC, ST आणि PH श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट दिली जाईल. विशेष बाब म्हणजे महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.
अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी, प्रथम आयआयटी कानपूर वेबसाइट https://www.iitk.ac.in/ वर जा. भर्ती विभागात जा आणि ‘ऑनलाइन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ‘Register New User’ वर क्लिक करून आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, लॉगिन करा आणि अर्ज भरा आणि श्रेणीनुसार विहित अर्ज शुल्क भरा. शेवटी, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. दरम्यान, लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.