spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी: SBI बॅकेत ६०० पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज

SBI PO Recruitment 2024: तरुणांना सरकारी नोकरी मिळवू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओची बंपर रिक्त जागा समोर आल्या आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया झाली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षे असावे.

पात्रता निकष काय आहेत?

अजर्दाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकाराकडून मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. पदाच्या पदवीच्या अंतिम वर्ष/ सेमिस्टरमध्ये असलेले इच्छुक उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम एक्व्हीबीचा https://sbi.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यानंतर होमपेजवरील SBI PO भरती २०२४ लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज अर्ज भरण्यासाठी आपल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करा. त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क भरा. अर्ज केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा. एसबीआय पीओ भर्ती २०२४ अधिकृत अधिसूचना करा.

परीक्षा पॅटर्न काय आहे?

एसबीआय पीओची निवड प्रीलिम्स, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी सह चार टप्प्यात केली जाईल. पूर्व परीक्षा १०० गुणांची असते. यामध्ये इंग्लिश लँग्वेजमधून ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडमधून ३५ प्रश्न आणि रिझनिंग अ‍ॅबिलिटीमधून ३५ प्रश्न विचारले जातात. प्रीलिम्स उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेतील प्रश्न २५० गुणांचे असतात. यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

अर्ज शुल्क काय आहे?

एसबीआय पीओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

एसबीआय पीओ पगार: मला किती पगार मिळेल?

पीओ पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा ४८,४८० रुपये बेसिक पगार मिळेल. एसबीआयच्या मुंबई केंद्रासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक १८.६७ लाख रुपये सुरुवातीचे वेतन मिळेल.

हे ही वाचा:

‘वन नेशन वन इलेक्शन’वर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘यापूर्वी देशात…’

पवारांच्या अनुपस्थितीत फडणवीस ठाकरे भेट राजकीय वर्तुळात खळबळ !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss