सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे Bank Of Maharashtra मध्ये १७२ रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट पदांनुसार लागू करण्यात आलीये. वय वर्ष २२ ते ५५ मधील उमेदवार नोकरीसाठी आपला अर्ज दाखल करू शकतात. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्रने विविध स्केल II, III, IV, V, VI, आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ज्या पदासाठी आपण योग्य असाल त्याचा अर्ज वेबसाईट वरून करू शकता. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीतून एकूण १७२ पदे भरायची आहेत. यामध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार सूचना वाचा आणि अर्जाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह किमान Btech किंवा BE पूर्ण केलेले असावे. परीक्षेसाठी नोंदणी करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतून ज्या पदासाठी ते अर्ज करू इच्छितात त्या पदासाठीचे शैक्षणिक निकष तपासले पाहिजेत.त्याचप्रमाणे, पदावर अवलंबून उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी सामान्य/EWS/OBC श्रेणींसाठी अर्ज शुल्क – रु ११८० (१८ % GST सह) आहे. तर, SC/ST/PwBD श्रेणींसाठी अर्ज शुल्क – रु ११८ (१८ % GST सह) आहे. सदर, पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. एकूण १०० गुणांपैकी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी किमान ५० गुण आणि SC/ST/PWD उमेदवारांनी किमान ४५ गुण प्राप्त केले पाहिजेत. एकदा जमा केलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
हे ही वाचा :
हाडांतील Calcium कमी झाल्यावर ओळखायचे कसे?