नोकरीच्या शोधात असणारे, बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आली आहे. UCO बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
UCO बँकेने स्थानिक बँक अधिकारी (LBO) च्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या एकूण २५० पदांची भरती करणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार ५ फेब्रुवारीपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटला अर्ज करु शकतात. १६ जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात एकूण २५० जागांपैकी ७० जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यनिहाय रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवार त्यांच्या पसंतीच्या राज्यात अर्ज दाखल करू शकतात.
यासाठी कोणते निकष व पात्रता लागते? निवड प्रक्रिया कशाप्रकारे असते?
प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असणं गरजेचं आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. अधिसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ज्यामध्ये तर्क आणि संगणक योग्यता, सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरुकता, इंग्रजी भाषा आणि डेटा विश्लेषणाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना बँकेकडून कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
SC/ST/PwD श्रेणीतील अर्जदारांना १७५ रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु ८५० आहे. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.अर्ज भरण्यासाठी
१. UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.com ला भेट द्या.
२. ‘करिअर’ किंवा ‘रिक्रूटमेंट’ विभागात जा आणि LBO भरतीसाठी लिंक उघडा.
३. अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा.
५. अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करा.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .