सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँकेत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. क्रेडिट ऑफिसर (कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल I) च्या पदांसाठी अर्ज मागण्यात येत आहेत. ही भरती अर्ज प्रक्रिया ३० जानेवारी २०२५ पासून सुरु झाली असून उमेदवार २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
उमेदवारांना पदवी पूर्ण करणं गरजेचं
उमेदवारांनी हा अर्ज भरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. उमेदवाराने किमान ६० टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. तर SC/ST/OBC/PWBD श्रेणीतील उमेदवारांना५ टक्के सूट देण्यात आली आहे. या उमेदवारांना ५५ टक्के सूट ठेवण्यात आली आहे. तसेच सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्जाची फी ७५० रुपये इतकी आकारण्यात आली आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क १५० रुपये ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असल्या कारणाने फी फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ibpsonline.ibps.in/cbicojan25/ या मुख्यपृष्ठावर “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा”. या लिंकवर क्लिक करत उमेदवारांनी आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी. नंतर उर्वरित तपशील भरून स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करून संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करा, त्यानंतरच पैसे भरावे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया असल्याकारणाने पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरा. ऑनलाईन फी आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून ती स्वतः जवळ ठेवा.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य