spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ६८ जागांसाठी भरती लगेच करा अर्ज, जाणून घ्या

India Post Payments Bank Recruitment २०२४: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने(IPPB) स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्हाला नववर्षाआधीच ही संधी मिळतेय. या भरतीसाठी २१ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) येथे स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांची भरती होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ६० हून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून, यामध्ये आयटी, सायबर सिक्युरिटी आणि इतर तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा शोध तज्ज्ञ घेत आहेत. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीचे सर्व तपशील लिहून घ्या आणि अर्जाची लिंक ॲक्टिव्ह होताच अर्ज करा.

पदसंख्या एकूण : ६८ जागा

पदांचे नाव आणि तपशील :

१. असिस्टंट मॅनेजर- एकूण ५४ जागा
२. मॅनेजर- एकूण ०४ जागा
3. सिनियर मॅनेजर- एकूण ०३ जागा
४. सायबर सुरक्षा तज्ञ- एकूण ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : आयसीएआय येथील चार्टर्ड अकाऊंटन्ट पदवी प्राप्त. (या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : ०१ एप्रिल २०२४ रोजी [एससी /एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
शुल्क :(१) सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु ७५०रु
(२) राखीव वर्ग – फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जानेवारी २०२५
आधिकृत वेबसाईड :https://www.ippbonline.com/hi/web/ippb

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss