देशात बहुचर्चित ठरलेल्या अग्निवीर भरतीचे अधिसूचना (नोटिफिकेशन) निघाली आहे. भारतीय हवाई दलासाठी अग्निवीर भरतीची प्रक्रिया ७ जानेवरी २०२५ पासून सुरु होणार आहे. २७ जानेवरी २०२५ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या भरतासाठी httpsagnipathvayu.cdac.in/AV/ या वेबसाईटवरुन अर्ज करता येणार आहे. भारतीसाठी पात्रता, शिक्षण आणि शारिरीक क्षमता काय आहे, त्याची माहिती जाणून घेऊ या.अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवरी २००५ ते १ जुलै २००८ दरम्यान झालेला असावा. निवड प्रक्रियेत सर्व चाचण्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी २१ वर्षापेक्षा जास्त असू नये.
उंची आणि हवी :
१. पुरुष : १५२ सेमी
२. महिला : १५२ सेमी
३. उत्तरखंड मधील महिला उमेदवार : १४७ सेमी
४. लक्षद्वीप : १५० सेमी
वय मर्यादा :
१. १७. ५ ते २१ वर्षे जन्मतारीख १ जानेवारी २००५ ते १ जानेवारी २००८ दरम्यान हवी
२. वयात सूट इंडियन एअरफोर्समधील अग्निवीर वायु इंटेक १/२०२६ मधील नियमानुसार दिली जाईल.
शुल्क:
१. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : ५५० रुपये
२. एससी/एसटी/पीएच : १०० रुपये
असा असणार पगार :
पहिल्या वर्षी : ३०,०००
दुसऱ्या वर्षी : ३३,०००
तिसऱ्या वर्षी : ३६,५००
चौथ्या वर्षी : ४०,०००
असा करा अर्ज :
ऑफिशियल वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/AV/ वरुन अर्ज करावा.त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा वरती नाव, पासवर्डने लॉग इन करा.फॉर्ममध्ये पासपोर्ट साइज फोटो, सिग्नेचर आणि अन्य डॉक्यूमेंट्स अटॅच करा. शुल्क भरल्यानंतर फार्म सबमिट करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकींगने शुल्क भरा. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
कोण करू शकता अर्ज :
विज्ञान शाखेसाठी उमेदवार ५०% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्रासह १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीत ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. विज्ञान शाखेशिवाय दुसऱ्या कोणत्याही शाखेतून ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहावी. सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे अग्निवीर पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षा विज्ञान किंवा इतर निवडलेल्या विषयांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.