मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॉडेल करिअर सेंटर मार्फत २७ युवकांना एसी टेक्निशीयन म्हणून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री लोढा याची त्यांचे मत व्यक्त केले. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (Confederation of Indian Industry) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी व्यक्त केला.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेवून प्रशिक्षण उपलब्ध करुन देत आहे. सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेच्या सहकार्याने पालघर व या परिसरात आयटीआय सोबत दहावी, बारावी व पदव्युत्तर युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आगामी एक वर्षात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआय या संस्थेचे भारताचे जनरल मॅनेंजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम, एकलव्य व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे प्रशिक्षक उमाकांत लोखंडे, एकलव्य आयटीआयचे रघुनाथ धुमाळ यासह पालघर आयटीआयचे अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा :
Cricket Retirment : श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू होणार होणार निवृत्त, टीमला मोठा धक्का