spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Maharashtra 11th Admission : पुढील वर्षापासून 11वीचा प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन पद्धतीने; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra 11th Admission : राज्यभरातील इयत्ता अकरावीचे प्रवेश 2025-26 या शैक्षणिक वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण आयुक्त नियंत्रण ठेवणार असून, त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात येईल. आतापर्यंत फक्त मुंबई एम एम आर रीजनसह सहा महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने व्हायची मात्र आता राज्यभर ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

( Maharashtra 11th Admission ) प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज मिळवावा लागत होता. हा अर्ज भरल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन त्यांची ‘कट ऑफ’ यादी पाहून प्रवेश घ्यावा लागत होती. या प्रक्रियेमुळे विद्यार्थी पालक यांचे हाल होत होते. त्यामुळे सर्व प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवावी, असा विचार राज्य सरकारने केला. ही प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्षापासून आता संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याआधी २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे आणि रायगड या मुंबई महानगर प्रदेशातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रवेशही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. मात्र याचा फायदा अमरावती, नागपूर आणि नाशिक यांना होत नसल्यामुळे शिक्षण विभागाने संपूर्ण महाराष्ट्र हा निर्णय लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रक्रियेत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक शाखानिहाय तुकड्या, अनुदानित-विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाखानिहाय प्रवेश क्षमता, उपलब्ध विषय आदी अद्ययावत माहिती सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक हे शिक्षण संचालकांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास उपलब्ध करतील. ही प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्षापासून आता संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Latest Posts

Don't Miss