spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Medical College Recruitment : वैद्यकीय शिक्षण विभागात नोकरीची सुवर्णसंधी, ६६६ पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर

Medical College Recruitment : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षकांसाठी हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असून ६६६ पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे होत असलेल्या या प्रक्रियेत उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या पदांमध्ये प्राध्यापकपदासाठी ७१ जणांची निवड करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १६७ सहाय्यक प्राध्यापकही नियुक्त केले जाणार आहेत.

या शैक्षणिक वर्षात राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. त्याचबरोबर राज्यातील याआधी असलेल्या २४ ते २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे रिक्त करण्यात आली होती. त्यात नऊ शासकीय महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी संख्या ९०० ने वाढली आहे. त्या तुलनेत पदांची संख्याही वाढल्याने सुमारे एक हजार ४०० पदे रिक्त आहेत.

या नव्या महाविद्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, या पदांवरील भरतीप्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया याआधीच सुरू झाल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचाही समावेश आहे.

राज्यभरात वैद्यकीय शिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेत राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. या आठ कॉलेजांच्या मान्यतेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने या परिषदेकडे पाठवला होता. परिषदेने हा प्रस्ताव सुरुवातीला फेटाळल्यानंतर वैद्यकीय विभागाने आरोग्य मंत्रालयाकडे दाद मागितली होती. अखेर या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून आता राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.

या मान्यतेमुळे राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय विद्यालयात ८०० जागा वाढणार आहेत. विशेष म्हणजे या जागा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीपासूनच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्यभरात वैद्यकीय शिक्षण विभागाची २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तर खासगी आणि शासकीय महाविद्यालये मिळून २२ हजार ८३३ जागा आहेत. त्या तुलनेत ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संथ्या प्रचंड आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे पाठवला होता. मात्र या महाविद्यालयांना विविध कारणांनी मंजुरी देता येणार नाही, असे आयोगाने म्हटले होते.

हे ही वाचा:

Rajan Salvi Resigned: ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या राजन साळवींचा राजीनामा: उद्धव ठाकरेंना रामराम

Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss