MH SET exam 2025 registration : सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (सेट) अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाकडून आयोजित करण्यात आली आहे. तर ही (४० वी) सहायक परीक्षा असून या पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी, १५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
MH SET exam म्हणजे काय?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता (MH SET) ही परीक्षा आयोजित करते. कला; वाणिज्य; विज्ञान; व्यवस्थापन; कायदा; मानसिक, नैतिक आणि सामाजिक विज्ञान; शिक्षण आणि शारीरिक शिक्षण या विद्याशाखांतर्गत 32 विषयांमध्ये MH SET परीक्षा घेतली जाते.
MH SET exam 2025 अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार?
सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://setexam.unipune.ac.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. ही अर्जप्रक्रिया विहित नमुन्यातच भरायची आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्जप्रक्रिया २४ फेब्रुवारीला सुरु होणार असून या अर्जप्रक्रियेचि शेवटची तारीख १३ मार्च पर्यंत आहे. अर्जप्रक्रियेला सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार असून १३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सेट परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. या परीक्षेची ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.
MH SET exam 2025 अर्जप्रक्रिया
अधिकृत वेबसाइट – setexam.unipune.ac.in वर MH SET परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लॉगिन टॅबवर क्लिक करा. नवीन नोंदणीवर क्लिक करा. नोंदणी तपशील भरा. नोंदणीकृत खात्यात लॉग इन करा ४० व्या एमएच सेट लिंकवर क्लिक करा. विचारलेले तपशील भरा. अर्ज शुल्क भरा. अर्ज फॉर्म प्रिंट करा आणि नंतर वापरण्यासाठी जतन करा.
Follow Us