सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. कारण, एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत असिस्टंट ऑफिसर पदासाठी जाहीरात निघाली आहे. एनटीपीसीमध्ये या पदासाठी ५० जागांवर भरती होणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी, १० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंमित मुदत आहे. शैक्षणिक अर्हतेचा विचार केल्यास इंजिनिअरींगची पदवी घेतलेल्या व डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना येथे अर्ज करता येईल. तर, या पदासाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्षे असणार आहे. तर, एसटी आणि एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट असेल, तर ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षांची सूट आहे.
पदसंख्या एकूण – ५० जागा
पदांचे नाव आणि तपशील –
१. असिस्टंट ऑफिसर (Safety) – एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता –
१. 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Electronics/ Civil / Production / Chemical / Construction / Instrumentation)
२. डिप्लोमा / एडवांस डिप्लोमा / PG डिप्लोमा (Industrial Safety)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वयाची अट – १० डिसेंबर २०२४ रोजी ४५ वर्षांपर्यंत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क – भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत, त्यांना अर्ज भरतेवेळी परीक्षा शुल्क बंधनकारक आहे, 300 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. मात्र, एससी, एसटी, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांना फीमध्ये माफी देण्यात आलीय.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२४
आधिकृत वेबसाईड – https://ntpc.co.in/en
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule