सरकारी नोकरी शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. ज्या युवकांची कोर्टात नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालय (Himachal Pradesh High Court Job) लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड तीन, ड्रायव्हर आणि शिपाई या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३१ डिसेंबर २०२४ आहे.
पदसंख्या एकूण : १८७ जागा
पदांचे नाव आणि तपशील :
१. अभियानांतर्गत लिपिकाची – एकूण ६३ जागा
२. स्टेनोग्राफर ग्रेड-३ – एकूण ५२ जागा
३. चालकाची – एकूण ०६ जागा
४. शिपाई/चौकीदार/सफाई कर्मचारी – एकूण ६६ जागा
शैक्षणिक पात्रता :
१.लिपिक: संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
२.लघुलेखक: किमान ५० % गुणांसह पदवी आणि स्टेनोग्राफी कौशल्ये (इंग्रजीमध्ये ८० W.P.M.) ४० W.P.M चा टायपिंग वेग इंग्रजीमध्ये आणि ३० W.P.M. हिंदीत अनिवार्य आहे.
३.ड्रायव्हर: वैध लाइट मोटर व्हेईकल (LMV) ड्रायव्हिंग लायसन्ससह मॅट्रिक आणि किमान तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव.
४. गट-डी कर्मचारी: मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण.
नोकरीचे ठिकाण : हिमाचल प्रदेश
वयाची अट : १८ ते ५० वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२४
आधिकृत वेबसाईड : https://hphighcourt.nic.in/
हे ही वाचा:
११ डिसेंबरला आमदारांचा होणार शपथविधी; कुणाच्या वाट्याला कोणते मंत्रिपद?