School certificate on app: शाळा प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळवणे झाले आता अधिक सोयीचे. एका क्लीकवर घरपोच दाखले मिळणार. जिल्हा प्रशासनाने पालकांना वेळेवर दाखले देण्याची अडचण एका ‘क्लिक’वर सोडवली आहे. शालेय दाखले मिळविणार कसे, असा प्रश्न पालकांना पडतो. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने एक ॲप तयार करून दाखले काढण्याची सोय केली आहे. ही सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर जिल्ह्यांमध्ये ‘सेवादूत’ नेमले आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र; तसेच सामायिक सुविधा केंद्रातील कर्मचारी ‘सेवादूत’ म्हणून काम करणार आहेत. ॲप वर स्वतःचे नाव, मोबाइल क्रमांक, ठिकाण नमूद केल्यावर तुमच्या जवळच्या सेवा केंद्राशी तुम्हाला जोडले जाईल.
शाळा प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी सेवा सेतू केंद्रात रांगेत थांबणे आता टळणार आहे. त्यासाठी सेवा सेतू केंद्रात जाण्याची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने एक ॲप विकसित केले आहे. त्याद्वारे ‘सेवादूत’ तुमच्या घरी येईल. तुमच्याकडील आवश्यक कागदपत्रे घेऊन तो तुम्हाला हवा तो दाखला देतील. त्याकरिता एका दाखल्यासाठी २४० रुपये मोजावे लागतील. ‘सेवादूतां’मार्फत ही सेवा पुणे जिल्ह्यात उपलब्ध केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका केंद्रावर सुविधा सुरू केली आहे. महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्रे; तसेच सामायिक सुविधा केंद्रात मिळणारे सर्व दाखले आता घरबसल्या एका ॲपवर मिळणार आहेत. यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे केंद्रावरचे हेलपाटे वाचणार आहेत. मानसिक त्रास वाचणार आहे.
जून महिना उघडताच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पालकांना वेध लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखलेही हवे असतात. हे दाखले वेळेत मिळतील, की नाही, याची शंकाच असते. त्याकरिता सेतू केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन दाखले वेळेत कसे मिळतील, यासाठी पालक प्रयत्नशील असतात. मात्र, आता ऑनलाइनद्वारे ही दाखले मिळत असले, तर ते लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक पालकांना नोकरीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत प्रवास करावा लागतो. त्यामुळे शालेय; तसेच विविध प्रकारच्या कामांना पालकांना वेळ मिळतोच, असे नाही. त्या वेळी अन्य कामे विविध ॲप, वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतात.
त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने पालकांना वेळेवर दाखले देण्याची अडचण एका ‘क्लिक’वर सोडवली आहे. जिल्हा प्रशासनाने एक ॲप तयार करून दाखले काढण्याची सोय केली आहे. त्यामुळे पालकांना दाखले काढणे आता सोयीचे झाले आहे.