तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये १ हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलीस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहेत. अहो, त्यातही केंद्र सरकारी कर्मचारी व्हायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) मंत्रालयीन आणि स्वतंत्र पदांच्या भरतीसाठी एक छोटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अभियानांतर्गत रेल्वेच्या विविध विभागांमध्ये एकूण १,०३६ पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रादेशिक RRB वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी ७ जानेवारीपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२५ आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध विभागांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक आणि प्राथमिक रेल्वे शिक्षक या पदांसाठी सर्वाधिक पदे भरण्यात येणार आहेत.
- पदसंख्या एकूण : १०३६ जागा
- पदांचे नाव आणि तपशील :
१. पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) – एकूण १८७ जागा
२. सायंटिफिक सुपरवायझर (एर्गोनॉमिक्स अँड ट्रेनिंग) – एकूण ३ जागा
३. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) – एकूण ३३८ जागा
४. चीफ लॉ असिस्टंट – एकूण ५४ जागा
५. सरकारी वकील – एकूण २० जागा
६. फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (इंग्लिश मीडियम) – एकूण १८ जागा
७. सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग – एकूण २ जागा
८. कनिष्ठ अनुवादक/हिंदी – एकूण १३० जागा
९. वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक – एकूण ३ जागा
१०. स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर – एकूण ५९ जागा
११. ग्रंथपाल – एकूण १० जागा
१२. संगीत शिक्षिका (महिला)- एकूण ३ जागा
१३. प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय) – एकूण १८८ जागा
१४. सहायक शिक्षक, कनिष्ठ विद्यालय (महिला) – एकूण २ जागा
१५. लॅब असिस्टंट/स्कूल – एकूण ८ जागा
१६. लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) – एकूण १२ जागा
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- वयाची अट : १८ वर्षे
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- शुल्क : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये भरावे लागेल.
किती पगार मिळेल?
पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचे वेतन ४७,६०० रुपये, तर वैज्ञानिक पर्यवेक्षक (एर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण), मुख्य विधी सहाय्यक, सरकारी वकील (सरकारी वकील) आणि शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) यासह प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) यांना ४४,९०० रुपये सुरुवातीचे वेतन मिळेल.
त्याचप्रमाणे वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक/हिंदी, वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक, कर्मचारी व कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय) आणि सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ शाळा (महिला) यांना 35,400 रुपये प्रारंभिक वेतन मिळणार आहे. तर लॅब असिस्टंट/स्कूल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० रुपये प्रारंभिक वेतन आणि लॅब असिस्टंट ग्रेड ३ (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९,९०० रुपये वेतन मिळेल. - अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ फेब्रुवारी २०२५
- आधिकृत वेबसाईड: https://www.rrbmumbai.gov.in/
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.