नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) या कंपनी साठी १०० हुन अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत आहे. AEE आणि भूभौतिकशास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती आहे. एईई (AEE) आणि जियोफिजिसिस्ट या पदांसाठी ही भरती काढण्यात आली इच्छुक आणि पात्र उमेदवार ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ongcindia.com वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया १० जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. अंतिम परीक्षा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. या भरतीद्वारे ओएनजीसीमध्ये एकूण १०८ पदे भरली जातील. तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर त्वरीत अर्ज करा.आणि आपले जॉब आजच सुरक्षित करा. कोणत्या पदांसाठी भारती निघाली आहे ? त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार जाणून घेऊया.
ONGC या कंपनीमध्ये एकूण १० पदांसाठी १०८ जागा रिक्त आहेत. जियोलॉजिस्ट – ५ पदे, जियोफिजिसिस्ट (भूतल) – ३ पदे,जियोफिजिसिस्ट (वेल्स) – २ पदे, एईई (प्रॉडक्शन) – मेकॅनिकल – ११ पदे, एईई (प्रॉडक्शन) – पेट्रोलियम – १९ पदे, एईई (प्रॉडक्शन) – केमिकल – २३ पदे, एईई (ड्रिलिंग) – मेकॅनिकल – २३ पदे, एईई (ड्रिलिंग) – पेट्रोलियम –६ पदे, एईई (मेकॅनिकल) –६ पदे, एईई (इलेक्ट्रिकल) –१० पदे रिक्त आहेत. तर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता
जियोफिजिसिस्ट (भूतल) पदासाठी जियोलॉजीमध्ये किमान 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा पेट्रोलियम जिओसायन्समध्ये किमान 60% गुणांसह MSc किंवा MTech डिग्री असावी.एईई पदांसाठी संबंधित विषयामध्ये किमान 60 % मार्क्ससह पदवी असावी. तर,या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २६ वर्षे ते ४२ वर्षे दरम्यान असावी, तर राखीव श्रेणीसाठी नियमावलीनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.या पदासाठी लागणाऱ्या अर्जाची किंमत सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणीसाठी अर्ज शुल्क माफ आहे. शुल्क ऑनलाइनद्वारे भरता येऊ शकतात.
ओएनजीसीत या पदांसाठी कॉम्प्युटर आधारित परीक्षा घेऊन निवडीची प्रक्रिया होईल. या परीक्षेत ४ विभाग असतील. सामान्य ज्ञान, संबंधित विषय, इंग्रजी आणि भाषा तसेच २ तासांच्या कालावधीत एक एप्टीट्यूड चाचणी. ओएनजीसीसाठी स्कोअरच्या आधारावर इंटरव्ह्यूसाठी १;५ प्रमाणात उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. अधिक शॉर्टलिस्टिंगसाठी ग्रुप डिस्कशन प्रक्रिया केली जाईल. ओएनजीसीमध्ये जियोफिजिसिस्ट आणि एईई पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला ६०,००० ते १,८०,००० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. त्याचप्रमाणे, त्यांना इतर भत्तेही दिले जातील. याबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी ओएनजीसीच्या ऑफिशिअल ongcindia.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.
हे ही वाचा:
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ५ वर तर ३ गंभीर जखमी!