सरकारी नोकरी हा शब्दच अनेकांसाठी सुखद असतो. सरकारी नोकरी असणाऱ्या मंडळींचा अनेकांनाच हेवाही वाटतो. यामागे कैक कारणं असतात. चांगली वेतनश्रेणी, विविध वेतन आयोग, सुट्ट्या, सुविधा आणि बरंच काही. अशाच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी रेल्वेनं एक सुवर्णसंधी आणली असून, त्याअंतर्गत हजारो नोकऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे.रेल्वेतून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुवादक आणि कादेतज्ज्ञांसह इतर विविध पदांसाठीची भरती होणार आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने लिपिक वर्ग आणि वेगवेगळ्या पदांसाठी ही संधी असणार आहे. भरती अभियानाचा उद्देश शिक्षक, अनुवादक आणि कायदा व्यावसायिकांसह अनेक श्रेणींमध्ये १०३६ पदे भरायची आहेत. ७ जानेवारीपासून सेवांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
६ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. मात्र, अद्याप अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. म्हणून, जे अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी नोंदणी तारखांसह अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहणे आवश्यक आहे.नोकरीच्या अधिसूचनेत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड, रिक्त पदांचे तपशील आणि इतर तपशील समाविष्ट असतील. RRB भरती महत्त्वाची आहे, भारतीय रेल्वेचे विविध विभागांमधील विविध रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.
पदसंख्या एकूण : १०३६ जागा
पदांचे नाव आणि तपशील :
पदव्युत्तर शिक्षक (PGT): एकूण १८७ जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): एकूण ३३८ जागा
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): एकूण ०३ जागा
मुख्य विधी सहाय्यक: एकूण ५४ जागा
सरकारी वकील:एकूण २० जागा
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (PTI) – इंग्रजी माध्यम:एकूण १८ जागा
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: एकूण ०२ जागा
कनिष्ठ अनुवादक हिंदी: एकूण १३० जागा
वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक: एकूण ०३ जागा
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: एकूण ५९ जागा
ग्रंथपाल: एकूण १० जागा
संगीत शिक्षिका (महिला): एकूण ०३ जागा
प्राथमिक रेल्वे शिक्षक: एकूण १८८ जागा
सहाय्यक शिक्षिका (महिला कनिष्ठ शाळा): एकूण ०२ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: एकूण ०७ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): एकूण १२ जागा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : १८ ते ४८ वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
शुल्क :सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी ५०० रुपये आहे, तर SC/ST उमेदवारांसाठी २५० रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ फेब्रुवारी २०२५
आधिकृत वेबसाईड :indianrailways.gov.in
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule