Pune : सावित्रीबाई फुले या पुणे विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बीबीए, बीसीए, एमबीए, एमसीए, एम.कॉम असे पाच अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरु करायला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बीबीए, एमसीए, एमबीए, असे तीन अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने करण्याची मान्यता देखील देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करणार असून, अभ्यासक्रमांची सुरुवात जानेवारीच्या सत्रापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या कारणामुळे अनेक विध्यार्थाना शिक्षण हे कमी शुल्कात विद्यापीठातून घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.
तसेच पुणे विद्यापीठाला ‘नॅक’ची ‘ए प्लस’ श्रेणी असल्याने, विद्यापीठाला दूरस्थ; आणि ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम सुरू करता येणार. यानुसार ‘यूजीसी’ ने परिपत्रक प्रसिद्ध करून पुणे विद्यापीठाला तीन अभ्यासक्रम दूरस्थ आणि पाच अभ्यासक्रम हे विद्यार्थाना ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याला मान्यता दिली आहे. परंतु, हे पत्र उशिरा मिळाल्याने, विद्यापीठाला लगेच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याला अडचणी येत आहेत. परंतु, जानेवारीच्या सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया हे येत्या १५ दिवसांमध्ये सुरु करण्याचे नियोजन हे विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. या चार अभ्यासक्रमाचे शुल्क हे माफ असल्याने, अनेक विद्यार्थाना कमी शुल्कामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी हे अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थाना प्राप्त होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या मुफत आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेकडून (स्कूल ऑफ ओपन लर्निग) दोन्ही पद्धतीने अभ्यासक्रम सुरु करण्यासोबतच, यावरती नियंत्रण ठेवण्यात येईल. विद्यापीठाशी संलग्न नामांकित कॉलेजांमधील दूरस्थ अभ्यासक्रम हे स्टडी सेंटरमध्ये राबविण्यात येईल. यासाठी पुणे, नाशिक आणि नगरमधील विद्यापीठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये शनिवार आणि रविवारी विद्यार्थांना केंद्रांमध्ये जाऊन अनिर्वाय विषयांचे शिक्षण घ्यावे लागेल. त्याचबरोबर एमबीए, एमबीए अशा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थाना साधारण दोन वर्ष काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे.
जे विद्यार्थी यशस्वीरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करतात त्या विद्यार्थाना पुणे विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश परीक्षा किंवा गुणवत्ता यादी सादर करण्यात येणार नाही. विद्यार्थाना अभ्यासक्रमांची माहिती १५ दिवसांमध्ये, शाखा, शैक्षणिक कागदपत्रे, अर्हता, शुल्क, क्रेडिट्स, सत्रनिहाय सिलॅबस, संपर्क आदींची माहिती http://unipune.ac.in/SOL/ या वेबसाइटवर दाखवले जाणार आहे. प्रवेशप्रक्रिया हे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही माहिती प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.