spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

TEAM INDIA च्या खेळाडूंमध्ये तणाव, गौतम गंभीरच कॅप्टन रोहित शर्माबद्दल मोठी बातमी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता शेवटचा कसोटी सामना बाकी आहे. सिडनीमध्ये पाचवा कसोटी सामना होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्मा खेळणार की नाही? हे आताचं सांगणं कठीण आहे. कारण हेड कोच गौतम गंभीरने प्रेस कॉन्फरन्समध्ये या प्रश्नाच थेट उत्तर दिलं नाही. गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत थेट विचारण्यात आलं की, सिडनीमध्ये रोहित शर्मा खेळणार आहे का? यावर गंभीरने टॉसच्यावेळी याचं उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितलं. रोहित शर्मा कॅप्टन आहे आणि कॅप्टनची जागा टीममध्ये पक्की मानली जाते. अशावेळी जर हेड कोच प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन हे सांगत असेल की, रोहित शर्माच्या खेळण्याबद्दल निर्णय टॉसच्यावेळी होईल, तर विषय गंभीर आहे. रोहित शर्माच्या खेळण्याबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला? ते, जरा डिटेलमध्ये जाणून घ्या. आम्ही सामन्याच्या दिवशी प्लेइंग इलेव्हन बद्दल निर्णय घेऊ. कॅप्टनच्या खेळण्याविषयी अशा उत्तराने प्रश्न निर्माण होणारच आहे.

रोहित शर्माबद्दल हेड कोचकडे कुठलं स्पष्ट उत्तर का नाहीय? याचं कारण रोहितचा टेस्ट परफॉर्मन्स आहे. त्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या ३ टेस्ट मॅचच्या पाच इनिंगमध्ये आतापर्यंत फक्त ३१ धावा केल्या आहेत. म्हणजे फलंदाजीची सरासरी फक्त ६.२० आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा करणाऱ्या कुठल्याही कॅप्टनपेक्षा ही सरासरी कमी आहे.

गौतम गंभीरने आकाश दीपबद्दल कुठलंही सस्पेंस न ठेवता एकदम स्पष्ट उत्तर दिलं. आकाश दीपच्या सेवेपासून वंचित राहावं लागणार म्हणजे तो सिडनी कसोटीत खेळणार नाही हे स्पष्ट आहे. गौतम गंभीर यांच्याविषयी सुद्धा बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. गौतम गंभीर हे हेड कोचच्या पदासाठी बीसीसीआयची पहिली पसंत नव्हते. बीसीसीआयला व्हीव्ही एस लक्ष्मण यांना कोच बनवायचं होतं. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने हे माध्यमांना दिलं आहे. बीसीसीआयने काही परदेशी दिग्गजांशी संपर्क साधलेला. पण त्यावेळी चर्चा यशस्वी झाली नाही.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss