Work from Home – महिला नोकरदार वर्गासाठी खुशखबर. लवकरच महिला कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा देण्याचा निर्णय आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी घेण्यात आला आहे. महिला व बालिका विज्ञान दिनाच्या एक दिवस आधी हा निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वातील सरकार सध्या नोकरदार महिलांना वर्क फ्रॉर्म होमची सुविधा देण्यासाठी विचार करत आहे. सरकार या संदर्भात लवकर निर्णय जाहीर करेल, असे संकेत खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत. या सुविधेचा फायदा आंध्रप्रदेशात होणार आहे. या निर्णयामुळे महिलांच्या कार्यक्षमतेला अधिक चालना मिळेल असा विश्वास चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.
कोविडमुळे (Covid- 19) काम करण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्क फॉर्म होम करणे अधिक सोपे झाले आहे. त्यातून चांगले काम करता येत आहे. शिवाय त्यातून उत्पादकता ही वाढत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत, अशा निर्णयामुळे आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. शिवाय आपलं जीवनही संतुलीत बनेल. आम्ही आंध्रप्रदेशमध्ये (Andhrapradesh) सार्थक बदल आणणाऱ्या योजना आणत आहोत. आंध्र प्रदेश IT आणि GCC क्षेत्रात गेम चेंजिंग पाऊल उचलत असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही डेव्हलपर्सना प्रत्येक शहर, गाव, मंडळामध्ये आयटी कार्यालये निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. रोजगार निर्माण करण्यासाठी आयटी/जीसीसी कंपन्यांना समर्थन देत आहोत, असेही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.
‘इंटरनॅशनल डे ऑफ वूमेन अँड गर्ल्स इन सायन्स’च्या (International Day of women & girls in science) दिनानिमित्त मुख्यमंत्री चंद्रा बाबू नायडू यांनी STEM मध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांना आणि मुलींना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज आपण महिलांनी साधलेल्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची संधी देण्यासाठी महिलांना समान संधी आणि पूर्ण सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांना नोकरीत समान संधी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितलं. विज्ञान, इंजिनिअरिंग, उद्योग या क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. शिवाय महिलांना त्यांनी आतर्राष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. महिलांना पुढे येण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्नशील राहील असंही चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आंध्रप्रदेश मधील नोकरदार महिलांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा लागू होणार आहे.
हे ही वाचा:
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई