बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत आहे. चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनन्या पांडेने 2019 मध्ये ‘स्टूडेंट ऑफ द इयर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दरम्यान अनन्याचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात प्रवेश केला आहे. तसेच या आलिशान घराची पहिली झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनन्या ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते,त्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
अनन्याच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींसह चाहतेदेखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी अनन्याने स्वत:चं घर घेतल्याने तिचं सर्वांना कौतुक आहे. वडिलांची मदत न घेता स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर तिने हे घर घेतलं आहे. पूजेदरम्यान अनन्याने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अनन्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती नारळ फोडताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,”माझं स्वत:चं हक्काचं घर…तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक पाठिंब्याची गरज आहे..नवी सुरुवात..धनत्रयोदशीच्या शुभेच्छा”. अनन्याच्या या पोस्टवर फराह खानने लिहिलं आहे,”व्हा..अनन्या खूपच लवकर..तुझ्या आनंदात आणखी वाढ होऊ दे”. टायगर श्रॉफने लिहिलं आहे,”अनन्या खूप शुभेच्छा”, गौरी खानने लिहिलं आहे,”खूप-खूप शुभेच्छा”, शिल्पा शेट्टीने लिहिलं आहे,”अनन्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायमच आहे”.
अनन्या पांडे नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’मध्ये दिसली होती. या कार्यक्रमाच्या मंचावर तिने करिअर आणि लव्हलाईफबद्दल भाष्य केलं. सध्या ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. अनन्याचे ‘खो गए हम कहाँ’ आणि ‘कॉल मी बी’ हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हे ही वाचा :
आयकर छापेमारी, कुटेंचा भाजपत प्रवेश
CM EKNATH SHINDE: महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.