spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

TV actor Aman Jaiswal : अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू, भरधाव ट्रकने दिली धडक; जाणून घ्या सविस्तर माहिती

TV actor Aman Jaiswal : टीव्ही अ‍ॅक्टर अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील (Mumbai) जोगेश्वरी परिसरात हा अपघात झाला असल्याच्या समोर आले आहे. जोगेश्वरी पश्चिमेत टीव्ही ॲक्टर अमन जयस्वाल याचा अपघात झाला असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शूटसाठी जात असताना भरधाव ट्रकने दिली धडक

ॲक्टर अमन जयस्वाल २२ वर्षाचा असून १७ जानेवारी रोजी संध्याकाळी शूटिंगसाठी जोगेश्वरी पश्चिममधून बाईकवरून जात असताना त्याचवेळीस भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने अमनला जोरदार धडक दिली. यामध्ये अमनला गंभीर जखम झाल्या आणि उपचारादरम्यान जखमी अमनला जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारदरम्यान अमन जैस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातादरम्यान ट्र्क चालक फरार असून आंबोली पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ट्रक चालकाचा पोलीस कसून तपस करत आहेत.

कोण आहे अमन जयस्वाल?
उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी असलेल्या अमन जयस्वाल २२ वर्षाचा असून धरतीपुत्र नंदिनीमधील मुख्य भूमिकेतून त्याला ओळख मिळाली. त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात होण्यापूर्वी, त्याने मॉडेल म्हणून काम केले आणि नंतर रवी दुबे आणि सरगुन मेहता निर्मित लोकप्रिय शो उडानियांमध्ये दिसले. अमनने सोनी टीव्हीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या नाटकात यशवंत राव फणसे यांची भूमिका साकारली होती. धरतीपुत्र नंदिनी इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट या प्रोजेक्टबद्दल होती.पोस्टमध्ये, त्याने अभिनयातील आपला प्रवास शेअर केला, जेव्हा त्याने आपली आवड जोपासण्याचे ठरवले तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबाकडून झालेल्या तीव्र विरोधाचा प्रांजळपणे खुलासा केला.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss