मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या कामाने नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांना पसंद करणारा चाहता वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे. असाच एक नाव म्हणजे निवेदिता सराफ. साधारण तीन दशक मराठी सिनेसृष्टीचा काळ त्यांनी गाजवला.सध्या, मराठी मालिका विश्वामध्ये त्या सक्रिय झाल्या आहेत. अशातच, त्यांच्या एका चाहतीने वाढदिवसानिमित्त आपल्या हातावर ऑटोग्राफचा टॅटू काढला आहे.चाहतीने दिलेल्या या गिफ्टमुळे अभिनेत्री निवेदिता सराफ खुश होऊन भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
आपल्या आवडत्या कलाकारांसाठी चाहते नेहमीच काही ना काही करताना दिसत असतात. पूर्वीचे लोक कलाकारांसाठी रक्ताने पत्र लिहायचे, काहीजण कलाकारांच्या आवडत्या गोष्टी किंवा त्यांचे फोटो कोलाज करून द्यायचे.एखाद्या कलाकाराची गाडी जवळून जात असेल तर धावत तिच्या मागे जाणे. यांसारख्या अनेक गोष्टी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांसाठी करायचे. परंतु आता सोशल मीडियामुळे प्रेक्षक घरबसल्या कलाकारांबद्दल वेगवेगळ्या अपडेटस मिळत असतात. पण अजून सुद्धा असेच काही सच्चे चाहते दिसून येतात जे आपल्या आवडत्या कलाकारांसाठी काहीही करू शकतात.
नुकताच निवेदिता सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एका चाहतीने त्यांना खास गिफ्ट दिले आहे.तिने चक्क आपल्या हातावर निवेदिता सराफ यांनी ऑटोग्राफ म्हणून लिहिलेल्या तारीखेचा टॅटू काढला आहे. या ऑटोग्राफचा निवेदिता सराफ यांच्यासोबत फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सिने पडद्याची प्रत्येक स्क्रीन जादुई बनवणाऱ्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मला सतत Motivation देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा टॅटू २१/११/ २०२४ रोजी केला आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी २१/११/ २०२१ रोजी मी निवेदिता मॅमना भेटले होते. हा ऑटोग्राफ त्या दिवशी घेतला आहे. २०२४ मध्ये आम्हाला भेटून तीन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे मी ही आठवण आणखी खास बनवली. जी माझ्या कायम लक्षात राहून शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहील.
निवेदिता जोशी सराफ हे सिने इंडस्ट्री मधलं मोठं नाव आहे. आता त्या गेल्या काही वर्षांमध्ये लागोपाठ त्यांनी अनेक सुपरहिट मालिका दिल्या. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग हा सुद्धा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असा सगळ्या वयोगटातला आहे. निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आजवर अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण सध्या त्या मालिकांमध्ये भरपूर सक्रिय असतात. मागील काही वर्षांपासून त्या एकापाठोपाठ एक सुपरहिट महिला करत आहेत. आता त्या स्टार प्रवाह वरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत पाहायला मिळतात. यापूर्वी त्या कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला मोहिते म्हणून काम करत होत्या. झी मराठीवरील अगबाई सासुबाई ही मालिका सुद्धा त्यांची सुपरहिट झाली. याशिवाय नुकताच रिलीज झालेला संगीत मानापमान या सिनेमात त्या महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
हे ही वाचा:
Manikarao Kokate यांच्याकडून छगन भुजबळांबद्दल शांततेची भूमिका; म्हणाले, ‘तो’ विषय संपला…