Tejashri Pradhan : तेजश्री प्रधान ही मराठी नामांकित लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका तेजश्री प्रधानने अचानक सोडल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला असून यामागचं एक नवीन कारण समोर आलं आहे. अपूर्वा आणि तेजश्रीने एकमेकींना इन्स्टावरदेखील अनफॉलोसुद्धा केलंय. त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडण्यामागचं कारण अपूर्वा तर नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरु झाल्यापासून मुक्ता-सागरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. ‘झी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेनंतर तेजश्री प्रधान हिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत होतं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमधून ते चित्रपटापर्यंत स्वतःची छाप उमटवली. मात्र तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेतून बाहेर पडणार म्हटल्यावर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली.
प्रेमाची गोष्ट या मालिकेत अपूर्वा नेमळेकरने सावनी या खलनायिकेची भूमिका साकारली आहे. सावनी आणि मुक्ताच्या भांडणासारखंच खऱ्या आयुष्यातसुद्धा तेजश्री आणि अपूर्वा एकमेकींच्या वैरी झाल्या आहेत का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतोय. या मागचं नेमकं कारण म्हणजे दोघींही आपापल्या
इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं असून त्यांच्या दुबईच्या ट्रिपचे फोटोसुद्धा डिलीट केले आहेत. त्यामुळे अपूर्वाचं कनेक्शन असेल का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतोय.
तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर खास पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने लिहिलं होतं की, ‘चिअर्स… काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही.’ तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारतेय. मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवी मुक्ता प्रेक्षकांसमोर आली.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती