Wednesday, June 7, 2023

Latest Posts

Vilasrao Deshmukh यांच्या जयंतीनिमित्त Riteish Genelia ची खास पोस्ट, प्रत्येक दिवशी तुमची आठवण…

आज दिनांक २६ मे रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasroa Deshmukh) यांची जयंती आहे.

आज दिनांक २६ मे रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasroa Deshmukh) यांची जयंती आहे. आज विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.

२६ मे १९४५ रोजी महाराष्ट्रातील बाभळ या गावात विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. काँग्रेस नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेश देशमुख आणि विलासराव देशमुख यांच्यात मैत्रीचं नातं होतं. दिनांक १४ ऑगस्ट २०१२ रोजी चेन्नईत त्यांचं निधन झालं. तसेच विलासराव देशमुख यांचा जर राजकीय प्रवास पहिला तर, लातूर जिल्ह्यातले बाभळगाव हे त्यांचे गाव आहे. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विलासरावांनी गावच्या सरपंच पदापासून आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आमदार, मंत्री आणि दोन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी आपली छाप सोडली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी वेगवेगळ्या पक्षात राहूनही जपलेल्या मैत्रीचे किस्से आजही आठवणीत आहेत. त्यांचे वक्तृत्वही मोहवणारे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अभिनेता रितेशचे त्याचे वडील विलासराव देशमुख यांच्यासोबतचे खूप घट्ट आणि खास नाते होते. आज जयंतीनिम्मित रितेश खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रितेशची दोन्ही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असलेली दिसत आहेत. तसेच या पोस्ट मध्ये त्याने पप्पांची रोज आठवण येत असल्याचे सांगितले. “जेव्हा मला हताश वाटतं, आता यापुढे आपलं काहीही होऊ शकत नाही असं वाटतं, पराभव झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी त्या खडतर काळात मी विचार करतो की, मी कुणाचा मुलगा आहे. हा एक सकारात्मक विचार मला जग जिंकण्यासाठी प्रेरणा देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा… तुमची दररोज आठवण येते”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 रितेशने जशी आज पोस्ट केले आहे तशी सुनबाई म्हणजेच जिनिलीया देशमुखने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट ही केली आहे. जिनिलीयाच्या पोस्ट मध्ये त्यांची दोन्ही मूळ हे विलासराव देशमुख यांच्या फोटोसमोर वंदन करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत जिनिलीयाने लिहिलं आहे,”काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा… प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते”.

तसेच रितेश आणि जिनिलीया या दोघांच्याही पोस्टला अनेक चाहत्याने कंमेंट्स केल्या आहेत. तसेच विलासराव देशमुख यांच्याबद्दल त्यांचे पुत्र अमित देशमुख, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही अभिवादन व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss