Wednesday, April 24, 2024

Latest Posts

बार्क इंडियाच्या रिपोर्टनुसार Rupali Ganguly ची अनुपमा अव्वल स्थानावर

बार्क इंडिया प्रत्येक आठवड्याला टीआरपी रिपोर्ट जाहीर करत असते. बार्क इंडिया प्रत्येक आठवड्याला कोणती मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे कोणती मालिका टेलिव्हिजन फार काही चालत नाही याबाबतीत माहिती देत असते.

बार्क इंडिया प्रत्येक आठवड्याला टीआरपी रिपोर्ट जाहीर करत असते. बार्क इंडिया प्रत्येक आठवड्याला कोणती मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे कोणती मालिका टेलिव्हिजन फार काही चालत नाही याबाबतीत माहिती देत असते. आता या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला असून रुपाली गांगुली म्हणजेच मालिकेमधील अनुपमा आणि गौरव खन्नाच्या मालिकेने पुन्हा एकदा या आठवड्यात बाजी मारली आहे. अनुपमा मालिकेने स्टार प्लस वरची सर्वात जुनी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) आणि ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेला मागे टाकले आहे.

या आठवड्यामध्ये कोणत्या मालिका टॉप १० मध्ये आहेत ते खालीलप्रमाणे –

अनुपमा (Anupama) – रुपाली गांगुली आणि गौरव खन्नाची अनुपमा मालिका टीआरपीएच्या शर्यतीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान आहे. मालिकेतील रंजक वळणांचा टीआरपीवर परिणाम झाला आहे असे सांगण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये अनुपमा मालिकेला २.९ रेटिंग मिळाले आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेला २.१ रेटिंग मिळाले आहे आणि ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांना आवडली आहे.

गुम है किसी के प्यार में (Gum Hai Kisi Ke Pyar Mein) – गुम है किसी के प्यार में ही टीआरपीच्या शर्यतीत मागे पडत चालली. या मालिकेमधील बरेच नवे कलाकार आल्यामुळे या मालिकेवर टीआरपी मध्ये मागे पाडण्याचे कारण असू शकते. गुम है किसी के प्यार में या मालिकेची रेटिंग २.१ आहे.

फालतू (Faltu) – काही महिन्यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नवी मालिका निहारिका चौकसेच्या ‘फालतू’ या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत १.८ रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत.

ये है चाहते (Yeh Hai Chahatein) – रुद्राक्ष आणि प्रिशा हे दोघे मुख्य भूमिकेत असलेले ‘ये है चाहते’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला या आठवड्यामध्ये १.७ रेटिंग मिळाले आहे.

इमली (Imlie) – ‘इमली’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये या आठवड्यामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला १.७ रेटिंग मिळाले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये मागे पडली आहे. या मालिकेमधील अनेक नव्या भूमिका साकारणारे कलाकार आले आहेत अनेक चाहत्यांनी यावर जुने भूमिका साकारणारे कलाकार पुन्हा आणा अशा मागण्या केल्या होत्या. या मालिकेला १.५ रेटिंग मिळाले आहे.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss