मराठी मालिका, टीव्ही, सिनेमा, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच नाटक यांसारख्या विविध क्षेत्रात अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar)काम केलय. गेल्या १४ वर्षांपासून तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आजही त्याला टीव्ही अभिनेता असंच म्हटलं जातंय.मराठी सिनेइंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आजवर त्यानं साकारलेल्या विविध भूमिकांची झलक दाखवणारा हा व्हिडिओ प्रेक्षकपसंतीस उतरताना दिसतोय. ‘विविधांगी भूमिकांचा अवलिया नायक’ म्हणून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतला ‘श्री’ असो किंवा ‘स्कॅम २००३'(Scam 2003) मधला जयंत करमरकर; त्यानं प्रत्येक भूमिका उत्तमरित्या वठवली. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘सोपं नसतं काही’, ‘शो टाइम’, ‘गुनाह’, ३१ दिवस अशा अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये त्यानं प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय ही मुख्य भूमिका साकारतोय. त्याचं हे कामही प्रेक्षकांना आवडतंय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत शशांकच्या विविधांगी भूमिकांची झलक पाहायला मिळतेय. शशांकच्या एका चाहत्यानं हा व्हिडीओ बनवला आहे.
शशांकनं चाहत्यांचे आभार मानत; हा खास व्हिडीओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘गेल्या १४ वर्षांत मी बरंच काम केलं. इतकं करूनही शेवटी लोक सहज म्हणतात, तू टीव्हीचा ऍक्टर आहेस.याबद्दल शशांकने खंत व्यक्त केली आहे. माझ्यासाठी कोणतंही माध्यम लहान-मोठं नाही. प्रत्येक व्यक्तिरेखा माझ्यासाठी एक नवी जबाबदारी आणि संधी असते, जिच्या माध्यमातून मी स्वतःला पुन्हा नव्यानं शोधतो आणि घडवतो’, असं शशांकने आवर्जून सांगितले. अभिनयाइतकीच त्याच्या स्पष्टवक्तेपणाचीही नेहमी चर्चा होते. सोशल मीडियावर तो निर्भीडपणे त्याचा मुद्दा मांडतो. हे त्याच्या चाहत्यांना भावतं. ‘मागच्या १४ वर्षांत मी विविध माध्यमांमध्ये, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. कधी सकारात्मक, कधी नकारात्मक, कधी संवेदनशील, तर कधी धाडसी. प्रत्येक भूमिकेचा आत्मा समजून घेत त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला, असं शशांक म्हणाला.परंतु आपल्या कामाला कोणी कमी दाखवले तर त्याचे वाईट वाटते, अशी खंत अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
या कारणांमुळे भाजप Delhi Vidhansabha Election मध्ये बहुमताच्या दिशेने
Follow Us