spot_img
spot_img

Latest Posts

सूर्यवंशी’ नंतर पुन्हा रोहित शेट्टीसोबत करणार काम

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत होता, त्यातच अक्षयच्या OMG2 ला प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिले. तर आता अक्षय त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याचे चित्रपट तर कधी त्याचे व्हिडिओ. आता त्यातच त्याने त्याच्या लाडक्या लेकासाठी एक खास पोस्ट शेयर केली होती. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत होता, त्यातच अक्षयच्या OMG2 ला प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिले. तर आता अक्षय त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा हातमिळवणी करणार आहे. २०२१ मध्ये या जोडीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.गेल्या काही दिवसांपासून रोहीत शेट्टीच्या सिंघम रिर्टन या चित्रपटाची चर्चा आहे. त्यात अजय देवगण दिसला होता. यापुर्वीही रोहितच्या कॉप यूनिवर्समध्ये अजय होताच त्यानंतर यात रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांची एंट्री झाली. कोरोना काळात ‘सूर्यवंशी’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.आशिकी-2’ चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या तयारीत आहेत, ज्यामध्ये रोहित आणि अक्षय कुमार हे निर्माता म्हणुन सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहे. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक मोहित सुरी ज्याने ‘मलंग’ सारखा चित्रपट केले आहेत त्याच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमारला अभिनेता म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर रिपोर्टनुसार हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. मोहित सूरीचा हा आगामी चित्रपट रोहित शेट्टी पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करणार आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू कुणीही दिलेला नाही.अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलिज झाले आहे. ज्याचे नाव ‘मिशन राणीगंज’ आहे. ज्याचे दिग्दर्शक टिनू सुरेश देसाई करणार आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर तो Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये दिसेल. टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाही अक्षय दिसणार आहे. अक्षय त्याच्या जुन्या स्टारकास्ट सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत ‘हेरा फेरी ३’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या वेलकम टू जंगल या चित्रपटाचाही टिझर नुकताच रिलिज झाला आहे. त्याचबरोबर तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून मराठी चित्रपटातही एन्ट्री करत आहे.

हे ही वाचा: 

अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई

वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच होणार लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss