Wednesday, April 24, 2024

Latest Posts

‘Anupamaa’ फेम Nitesh Pandey यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, एकाच इंडस्ट्रीला तिसरा धक्का

अनुपमा’ (Anupamaa) फेम नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. मोठं मोठे मार्गावर (Expressway) आणि अपघात यांचं जणू एक समीकरणच जुळलं आहे. रोज कुठे ना कुठे अपघात हा होतच असतो. अश्यातच टीव्ही इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. ‘अनुपमा’ (Anupamaa) फेम नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

एकाच आठवड्यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीला तिसरा मोठा धक्का बसला आहे. दिनांक २२ मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं. त्यानंतर मंगळवारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायने कार अपघातात आपले प्राण गमावले. आता ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कुमारची भूमिकाची साकारणारे अभिनेते नितेश पांडे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

अभिनेता नितेश पांडे यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत नितेश पांडे हे धीरज कपूरची भूमिका साकारत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितेशला मंगळवारी दुपारी २ वाजता नाशिकजवळील इगतपुरी येथे हृदयविकाराचा झटका आला. तो शूटिंगसाठी येथे आला होता. हृदयविकाराच्या झटक्याने नितेशचा मृत्यू झाला.

नितेश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांनी चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेत काम केले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, आधी अश्विनी काळसेकर यांच्याशी लग्न झाले होते, ज्याचे लग्न आता मुरली शर्मासोबत झाले आहे. तसेच ‘ओम शांती ओम’ चित्रपटात तो शाहरुख खानच्या असिस्टंटच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. त्याच वेळी, तो दिशा परमार आणि नकुल मेहता स्टारर शो ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नितेश पांडे यांनी १९९५ पासून टीव्हीच्या दुनियेत काम करण्यास सुरुवात केली. ‘तेजस’, ‘सया’, ‘मंजिलीं अपनी अपनी’, ‘जस्तजू’, ‘हम लड़कियाँ’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता पार्टनरशिप का’, ‘महाराजा की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. जय हो’, ‘हीरो-गैब मोड ऑन’ करण्यासोबतच तो ‘अनुपमा’मध्ये धीरज कपूरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने ‘बधाई दो’, ‘मदारी’, ‘दबंग 2’ सारख्या चित्रपटातही काम केले.

हे ही वाचा : 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss