बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे. १० लाख रुपयांच्या फसवणुकीशी हे प्रकरण संबंधित आहे. न्यायालयानं वारंवार समन्स पाठवूनही सोनू सूद साक्ष देण्यासाठी हजर झाला नाही.त्यामुळे अभिनेता सोनू सूद आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. लुधियाना न्यायालयाने (Ludhiana Court) त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.सोनू सूदला कधीही अटक केली जाण्याची शक्यता आहे. कोर्टानं सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी केलं असून त्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता सोनू सूदविरोधात लुधियाना न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता न्यायालयानं अभिनेत्याला अटक करून हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लुधियानाचे वकील राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला. यामध्ये त्याला बनावट रिझिका नाण्यांमध्ये (Rijika Coin)गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आलं. त्याच प्रकरणात वकील राजेश खन्ना यांनी फसवणुकीचा आरोप केला आणि त्याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी सोनू सूदला बोलावण्यात आलं.परंतु वारंवार बोलावून देखील सोनू सूद उपस्थित राहिला नाही त्यामुळे लुधियाना न्यायालयानं त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. अभिनेत्याविरुद्ध हे वॉरंट न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर (Ramanpreet Kaur) यांनी जारी केलं आहे. सोनू सूदला न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आलं. पण, अनेक वेळा समन्स पाठवूनसुद्धा सोनू सूद एकदाही साक्ष देण्यासाठी न्यायालयात पोहोचला नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयानं आता सोनूविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनला पाठवलेल्या वॉरंटमध्ये सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की, “सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आलं आहे. परंतु तो न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे. त्यामुळे तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.” या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होईल. सध्या या प्रकरणात सोनू सूद किंवा त्यांच्या टीमकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सोनू सूद नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फतेह’ मध्ये दिसून आला. पण, अपेक्षेप्रमाणे हा चित्रपच बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
हे ही वाचा :
Follow Us