spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Ashok Saraf Birthday Special, मामा त्यांच्या शर्टाचे २ बटन का उघडे ठेवतात ?

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत फॅशन, स्टाईल, ट्रेंड या गोष्टी फार पूर्वीपासूनच अगदी सामान्य आहेत. कलाकारांनी चित्रपटांमध्ये एखादी नवी स्टाईल ट्राय केली की तो ट्रेंड सेट होणारच हे नक्की.

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत फॅशन, स्टाईल, ट्रेंड या गोष्टी फार पूर्वीपासूनच अगदी सामान्य आहेत. कलाकारांनी चित्रपटांमध्ये एखादी नवी स्टाईल ट्राय केली की तो ट्रेंड सेट होणारच हे नक्की. आपल्या आवडत्या अभिनेत्याने कशी केशभूषा तसेच वेशभूषा केली आहे याकडे चाहत्यांचे बारकाईने लक्ष असते. चाहते याकडे फॅशन म्हणून पाहतात आणि ते फॉलो सुद्धा करतात. मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ हे नाव ट्रेंड सेटर म्हणून ओळखले जाते. अशोक सराफ हे चित्रपट सृष्टीतील सर्वांचे लाडके मामा म्हणून ओळखले जातात. मामांनी अनेक सुपरहिट चित्रपट सृष्टीला दिले. त्याच सोबत मामांनी स्टाईलचा एक नवा पायंडा सुद्धा पाडला होता. त्याच बद्दल आज आपण जाणून घेऊयात.

मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांना सर्वजण मामा म्हणून ओळखतात. ‘अशी हि बनवा बनवी’, ‘धुमधडाका’ असे अनेक चित्रपट आज देखील प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. अशोक सराफ यांच्या विनोदी वृत्तीची तसेच विनोदाच्या अचूक टायमिंगची गोष्टच वेगळी होती. मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील मामांनी आपला ठसा उमटवला. अशोक सराफ हे नाव फक्त अभिनयासाठीच नव्हे तर एका स्टेटमेंटसाठी सुद्धा ओळखले जात होते.

अशोक सराफ यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी असत. अशोक सराफ यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत विशेष वक्त्याव केले होते. शर्टची दोन बटने उघडी असण्यामागचं कारण एकतर फॅशन हे आहेच पण त्याचं खरं कारण म्हणजे अशोक सराफ यांना शर्टची पूर्ण बटने लावल्याने अस्वस्थ वाटत असे. त्यांना यामध्ये गुदमरल्यासारखं व्हायचं. आणि शर्टची दोन बटने उघडी ठेवल्याने त्यांना फारच मोकळं आणि छान वाटायचं. अशात त्यांना अतिशय मोकळेपणाने कामही करता यायचं. आणि म्हणूनच मामा आपल्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी ठेवत. परंतु कालांतराने त्यांच्या चाहत्यांना ती फॅशन वाटू लागली आणि अशाप्रकारे मामांनी हा नवा ट्रेंड सेट केला.

हे ही वाचा:

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

IPL2023 सारखाच राहणार का Ajinkya Rahaneचा पवित्रा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss