Friday, April 19, 2024

Latest Posts

Ashok Saraf Birthday Special, वडिलांसाठी १० वर्ष केली बँकेत नोकरी, कसा मिळाला मराठी चित्रपटसृष्टीला अजरामर तारा? जाणून घ्या!

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाला आपले वेड लावणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf ). तुमचे आमचे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लाडके मामा.

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाला आपले वेड लावणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf ). तुमचे आमचे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लाडके मामा. मामांनी आपल्या अनेक सिनेमातून प्रेक्षकांना खदखदून हसवले. विनोदाच्या जबरदस्त टायमिंग असलेल्या या अभिनेत्याला कोण नाही ओळखत. मराठी चित्रपटसृष्टीत ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आजही अनेकांच्या हृदयावर अधिराज्य करतात. मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टितही मामांनी आपली कमाल छाप उमटवली आहे. परंतु मामांचा हा प्रवास सोपा कधीच नव्हता. मामांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उत्तर पहिले आहेत. त्यातलाच एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत.

अशोक मामांचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. मामांना सुरवातीपासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु वडिलांच्या इच्छेसाठी अशोक सराफ यांनी तब्बल १० वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. सर्वसामान्य घरातील वडिलांप्रमाणे त्यांच्याही वडिलांची ईच्छा होती की मामांनी बँकेत नोकरी करावी .आणि मामांनी वडीलांच्या इच्छेसाठी नोकरी केली सुद्धा परंतु नोकरीत मन न रमल्याने त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळायचं ठरवलं.

अशोक सराफ यांनी पहिल्यांदा लोकप्रिय मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ‘ययाति’ पुस्तकावर आधारित नाटकात काम केलं. त्यांनतर त्यांनी अनेक नाटकं केली. त्यातून यश मिळायला लागल्यावर अशोक सराफ सिनेमा कडे वळले. अशोक सराफ यांनी सुरुवातीला काही सिनेमात काम केलं परंतु ते खूप कमी प्रमाणात चालली. त्यानंतर १९७५ साली आलेल्या ‘पांडू हवालदार’ या सिनेमातून मामांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मामांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ते मराठी सिनेसृष्टीचा उजळणार तारा झाले.

मराठी चित्रपट सृष्टीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत मामांनी आपले कमालीचे योगदान दिले. त्यांच्या अनेक भूमिकेंना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. ‘करण अर्जुन’ सिनेमातील त्यांचा दुर्जन सिंह असो किंवा मग ‘सिंघम’ सिनेमातील हेड कॉन्स्टेबल असो. बॉलिवूडचे प्रेक्षकही अशोक सराफ यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक कौतुक करतात.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss