Saturday, April 20, 2024

Latest Posts

Ayushmann Khurrana च्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन, शोक अनावर…

बॉलीवूडमधील नामांकित अभिनेता आयुष्यमान खुराणा यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना आयुष्यमानच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

बॉलीवूडमधील नामांकित अभिनेता आयुष्यमान खुराणा यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना आयुष्यमानच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आयुष्यमानचे वडील अनेक दिवसांपासून आजारी होते. हार्टअटॅक वर उपचार सुरु होते. चंदिगढमधल्या मोहालीत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हे उपचार सुरु होते. शेवटी आज सकाळी १०. ३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे.

आयुष्यमान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणाच्या प्रवक्त्यानीं ही माहिती दिली आहे. ‘आयुष्यमान (Ayushmann Khurrana) आणि अपारशक्ती (Aparshakti Khurana) यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. मागील काही दिवसं पासून ते आजारी होते’. अशी माहिती आयुष्यमान आणि अपारशक्ती यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. आयुष्यमान खुराणा आणि त्याच्या वडीलांमधले नात खूप घट्ट होत. वडिलांसाठी आयुष्यमानने सोशल मीडिया वर एक पोस्ट देखील लिहली होती. ‘मला जे काही मिळालं आहे ते वडिलांकडून च मिळालं,शिस्त, संगीताबद्दलचं प्रेम, कविता, चित्रपट आणि कला. वडिलांनी कायद्याचं LAW शिक्षण घेतलं होत. पण ज्योतिषींमध्ये (Astrology) त्यांना जास्त रस होता,ते नामांकित जोतिषी सुद्धा होते. म्हणनूच माझ्या नावात N आणि R दोन वेळेस आहे’, असं आयुष्यमान खुराणा ने आपल्या पोस्ट मध्ये लिहंल होत.

आयुष्यमान चे वडील पंडित पी. खुराणा हे खूप प्रसिद्ध ज्योतिषी होते. ज्योतिषविद्ये संबंधित अनेक पुस्तके पंडित पी. खुराणा यांनी लिहली आहेत. ज्योतिषीविषयक असलेल्या या ज्ञानामुळे प्रचंड प्रसिद्धी आणि मान त्यांना मिळाला होता. आयुष्यमान खुराणा ने एका मुलाखतीत सांगितले होते कि, “मला ज्योतिषशास्त्रात विश्वास नाही. पण माझे वडील हेच माझे प्रशिक्षक आणि गुरू आहेत. ते मला नेहमी म्हणायचे की, बाळा लोकांची आवड ओळख आणि मी तेच केलं.”

हे ही वाचा : 

Box Office वर सुपरहिट ठरणाऱ्या ‘The kerla story’ साठी अदाने घेतले ‘इतके’ मानधन

Cannes Film Festival मध्ये Urvashi Rautela चा हटके मेकओवर, ‘या’ अभिनेत्रीची कॉपी केल्याची नेटकऱ्यांची टीका

समीर वानखेडेंनी सादर केले शाहरुख सोबतचे संभाषण, “माझ्या मुलाची काळजी घे”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss